RRTS Rapid Rail: देशातील सर्वात वेगवान ट्रेन सज्ज, मिळणार फर्स्ट क्लास सुविधा

ही RRTS रेल्वे 180 किमी वेगाने धावणार असून ही देशातील पहिली फास्ट रेल्वे असेल
Regional Rapid Transit System train
Regional Rapid Transit System trainsakal

दिल्ली ते मेरठपर्यंत रेल्वेचे काम वेगाने सुरू आहे. हे स्वप्न २०२४ पर्यंत पूर्ण करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्याचा पहिला टप्पा २०२३ पर्यंत सुरू होईल अशी अपेक्षा आहे.

भारतातील पहिल्या आरआरटीएस ( RRTS) कॉरिडॉरचा पहिला ट्रेनसेट पूर्ण झाला आहे आणि 7 मे 2022 रोजी भारत सरकारच्या गृहनिर्माण मंत्रालयातील सचिवांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात एनसीआरटीसीकडे (NCRTC) सुपूर्द केला करण्यात आला 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत या अत्याधुनिक आरआरटीएस ट्रेनसेट गुजरातमधील सावली येथील अल्स्टॉमच्या कारखान्यात तयार केल्या जात आहेत.

Regional Rapid Transit System train
Khalistani Flag: हिमाचलमध्ये सीमाबंदी; पोलिस हायअलर्टवर

ही रेल्वे 180 किमी वेगाने धावणार असून ही देशातील पहिली फास्ट RRTS रेल्वे असेल. भारतातील पहिल्या रॅपिड रेल्वेची वैशिष्ट्ये आज आपण जाणून घेणार आहोत.

१. या रॅपिड ट्रेन मधील प्रत्येक सीटवर वायफाय, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे, सोबतच डायनॅमिक मॅप, ऑटो कंट्रोल अॅम्बियंट लाइटिंग सिस्टम (auto control ambient lighting system) असणार आहे.

२. NCRTC अधिकाऱ्यांच्या मते, आधुनिक RRTS ट्रेनमध्ये व्हेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग सिस्टम,तसेच व्हीलचेअर आणि सहज प्रवेशासाठी ट्रेनच्या दरवाजाजवळ स्ट्रेचर यांसारखी वैशिष्ट्ये देखील असतील.

Regional Rapid Transit System train
'प्रधानमंत्री आवास योजने'चा कालावधी आणखी दोन वर्षे वाढणार?

३. ही भारतातील सर्वात वेगवान RRTS रेल्वे असणार कारण त्यांचा डिझाईन वेग 180 किमी प्रति तास आहे आणि ऑपरेशनल वेग 160 किमी प्रति तास आहे.

४. या RRTS रेल्वेमध्ये फायर आणि स्मोक डिटेक्टर, अग्निशामक तसेच डोअर इंडिकेटर देखील असतील.

Regional Rapid Transit System train
'जहाँगीरपुरी'नंतर 'शाहीनबाग'वरही बुल्डोजर; अतिक्रमणांविरोधात कारवाई

५. या रेल्वेत मोठ्या सुरक्षा काच असून प्रवासी या काचाच्या खिडक्यांसह बाहेरील दृश्य सुद्धा बघू शकणार

६. या ट्रेन्समध्ये व्हिज्युअल आणि ऑडिओ अनाऊंन्सर असणार,ज्याद्वारे प्रवाशांना पुढील स्टॉप, ट्रेनचा वेग सोबत वर्तमान लोकेशन माहीत होणार.

Regional Rapid Transit System train
SCच्या 2 नव्या न्यायाधीशांचा शपथविधी; 30 महिन्याच्या प्रतिक्षेनंतर जागा भरल्या

७. डिझाइन केल्या आहेत, ज्या प्रवाशांना पुढील थांबा, अंतिम गंतव्यस्थान, ट्रेनचा वेग यासह इतर गोष्टींबद्दल माहिती देतात.

८. या आरआरटीएस रेल्वेमध्ये एक डबा महिला प्रवाशांसाठी राखीव असेल आणि हा प्रीमियम श्रेणीचा एक डबा असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com