Stray Dogs: माणसांचा जीव महत्त्वाचा! भटक्या श्वानांची काळजी घेणाऱ्या प्राणीप्रेमींना हायकोर्टाच्या महत्त्वाच्या सूचना

Dog Lovers Should Obtain License: भटक्या श्वानांप्रकरणी एक याचिका केरळ हायकोर्टामध्ये करण्यात आली होती. याप्रकरणी हायकोर्टाने सुनावणी घेत महत्त्वाची टिप्पणी केली आहे.
Stray Dogs
Stray Dogsesakal

Stray Dogs: भटक्या श्वानांप्रकरणी एक याचिका केरळ हायकोर्टामध्ये करण्यात आली होती. याप्रकरणी हायकोर्टाने सुनावणी घेत महत्त्वाची टिप्पणी केली आहे. काही लोकांनी भटक्या श्वानांना मारण्याची मागणी केलीये, तर काही जण भटक्या श्वानांच्या संरक्षणासाठी लढत आहेत. याप्रकरणी न्यायमूर्ती पी व्ही कुन्हीक्रिष्णन यांनी खऱ्या श्वान प्रेमींना सल्ला दिला आहे.(Dog Lovers Should Obtain License From Local Authorities To Protect and Keep Them Kerala High Court)

वृतपत्रात लेख किंवा माध्यमांमध्ये बाईट देण्यापेक्षा खऱ्या श्वान प्रेमींनी पुढे येऊन श्वानांच्या संरक्षणासाठी स्थानिक प्रशासनाची मदत करायला हवी, असं न्यायमूर्ती म्हणाले आहेत. श्वान प्रेमींनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. प्राणी जन्म नियंत्रण आणि केरळ महामालिका कायद्यानुसार (Animal Birth Control Rules and Kerala Municipality Act) श्वानांची काळजी घेण्यासाठी परवाना घ्यावा, असं न्यायमूर्ती म्हणाले.

Stray Dogs
Belgian Dog in Police: पोलीस दलात 'किबा'ची एंट्री, बेल्जीयन मॅलेनियस प्रजातीचा श्वान, गुन्हेगारांना बसणार आळा

न्यायमूर्ती नेमकं काय म्हणाले?

माझं असं मत आहे की, श्वान प्रेमींनी वृत्तपत्र किंवा इतर ठिकाणी बोलण्यापेक्षा पुढे येऊन श्वानांच्या संरक्षणासाठी स्थानिक सरकारी संस्थासोबत सहकार्य करावे. त्यांनी प्रशासनाकडून परवाना मिळवावा आणि श्वानांचं संरक्षण करावं. लाईव्ह लॉने यासंदर्भात वृत्त दिलंय.

भटके श्वान आपल्या समाजाला धोका निर्माण करत आहेत. शाळेतील विद्यार्थी एकटे शाळेत जाण्यास घाबरत आहेत. त्यांना श्वानाच्या हल्ल्याची भीती वाटत आहे. श्वानांच्या विरोधात काही कारवाई केल्यास श्वान प्रेमी येऊन त्याला विरोध करत असतात. मला वाटतं की, माणसांना एका श्वानापेक्षा अधिक महत्त्व द्यायला हवं. पण, भटक्या श्वानांवरील व्यक्तींचे क्रूर हल्ले देखील रोखायला हवेत.

कोर्टात प्रकरण कधी आलं?

कन्नूर जिल्ह्यातील मुळाथाडम वार्डमधील प्राणी प्रेमी राजीव क्रिष्णनन यांना कंटाळून स्थानिक रहिवाशांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मुळाथाडम वार्ड हा लोकांनी गजबजलेला भाग आहे. याठिकाणी राजीव राहतात. एखाद्या श्वानावर हल्ला झाला, तो आजारी पडला तेव्हा राजीव त्यांना आपल्या घरी आणायचे आणि त्यांची काळजी घ्यायचे. अशा प्रकारे त्यांनी अनेक श्वानांना घरी आणले होते.

स्थानिकांनी याचिकेमध्ये दावा केलाय की, राजीव यांनी मोठ्या संख्येने श्वास घरी आणलेत. त्यामुळे त्याठिकाणी मोठी घाण निर्माण होत आहे. राजीव सर्व श्वानांची काळजी घेण्यास असमर्थ आहेत. सर्वत्र अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे स्थानिकांना याचा त्रास होत आहे. श्वास रात्री-बेरात्री भूंकत असतात त्यामुळे ध्वनी प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होत आहे.

Stray Dogs
Abhishek Ghosalkar Firing : ''गाडीखाली श्वान आला तरी हे लोक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील'', गोळीबार प्रकरणी फडणवीस काय बोलले?

कोर्टाने काय म्हटलंय?

राजीव यांना श्वान घरी ठेवण्यापासून रोखण्यात यावे यासाठी स्थानिकांनी याचिका दाखल केली होती. कोर्टाने यावर म्हटलंय की, स्थानिक प्रशासनावर श्वानांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्ती परवान्याशिवाय श्वानांना आपल्या घरी ठेवू शकत नाही.

राजीव यांच्याकडे परवाना नसल्याने आधी त्यांनी स्थानिक प्रशासनाकडून परवाना मिळवावा. राज्यात श्वानांचे हल्ले वाढले आहेत. दुसरीकडे, राजीव यांचे प्राणीप्रेम देखील कौतुक करण्यासारखं आहे.पण, त्यांनी नियमांनुसार परवाना घेणे आवश्यक आहे. श्वानांसाठी आवश्यक जागेत ठेवणे आणि परिसरात स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित कायद्याला अनुसुरुन त्यांनी श्वानांची काळजी घ्यायला हवी, असं कोर्ट म्हणालं. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com