esakal | दारु पिण्यासाठी २१ वर्षांची अट, दिल्ली सरकारच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ
sakal

बोलून बातमी शोधा

Liquor

२०१६ पासून दिल्लीमध्ये दारुसाठीची नवीन दुकाने उघडली गेली नाहीत, तसेच यापुढेही नवीन दुकाने उघडली जाणार नाहीत.

दारु पिण्यासाठी २१ वर्षांची अट, दिल्ली सरकारच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : दिल्ली सरकारने दारू पिण्याचे वय २५ वरून २१ केले आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सोमवारी (ता.२२) याबाबतची माहिती दिली. त्यानंतर सोशल मीडियात बरेच मीम्स व्हायरल होत आहेत. नव्या उत्पादन शुल्क धोरणांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. देशाच्या राजधानीमध्ये यापुढे कोणतीही नवीन दारुची दुकाने उघडली जाणार नाहीत, असे सिसोदिया यांनी स्पष्ट केले.

तसेच राजधानी दिल्लीत ६० टक्के दारुची दुकाने दिल्ली सरकार चालवत आहे. तर ४० टक्के दारुची दुकाने इतर खासगी व्यावसायिकांद्वारे चालवली जात आहेत. नवीन उत्पादन शुल्क धोरणामुळे दिल्ली सरकारच्या महसूलात आणखी वाढ होईल, अशी आमची अपेक्षा आहे, असं उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले. 

ग्वाल्हेरमध्ये बस आणि रिक्षाचा भीषण अपघात; १३ जणांचा जागीच मृत्यू​

विशेष म्हणजे, दिल्लीच्या जवळच असलेल्या नोएडा आणि गुरुग्राम शहरांमध्ये दारू पिण्याचं कायदेशीर वय हे २५ आहे. २०१६ पासून दिल्लीमध्ये दारुसाठीची नवीन दुकाने उघडली गेली नाहीत, तसेच यापुढेही नवीन दुकाने उघडली जाणार नाहीत. २१ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना दारू पिण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. दिल्ली सरकारच्या या निर्णयावर नेटकऱ्यांनी सोशल मीडियात मीम्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. 

थरकाप उडवणारा व्हिडिओ : कबड्डी स्पर्धेवेळी गॅलरी कोसळली; १०० हून अधिक जखमी​ 

गांधी शांतता पुरस्कार - बांगलादेशचे बंगबंधू आणि ओमानच्या सुलतानांचा गौरव​ 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)