दारूच्या नशेत 2 पुरुषांनी केलं लग्न! शुद्धीत आल्यावर...

दारुच्या नशेत दोन तरुणांनी एकमेकांशी लग्न केल्याचा विचित्र प्रकार तेलंगणामध्ये घडला आहे.
Male Married after drinking
Male Married after drinkingSakal

दारुच्या नशेत दोन तरुणांनी एकमेकांशी लग्न केल्याचा विचित्र प्रकार तेलंगणामध्ये घडला आहे. तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील जोगीपेट येथील २१ वर्षीय तरुणाचे लग्न मेडक जिल्ह्यातील चंदूर येथील २२ वर्षीय तरुणाशी झाले. दारुच्या नशेत या दोघांनी लग्न केलं.

डुमापलापेट गावातील एका ताडीच्या दुकानात दोघांची भेट झाली होती. त्यानंतर त्यांची मैत्री झाली. ते अनेकदा मद्यपानासाठी भेटत. गेल्या महिन्यात जोगीनाथ गुट्टा मंदिरात एका समारंभात चंदूर येथील या ऑटोचालक तरुणाने जोगीपेट येथील तरुणाच्या गळ्यात थाळी बांधली होती. सोहळा पार पडला तेव्हा ते मद्यधुंद अवस्थेत होते. लग्न झाल्यानंतर दोघे आपापल्या घरी गेले. (drunk men get 'married' with Each, separated later by giving Rs.10,000)

Male Married after drinking
Photo Story: महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील छत्रपती उदयनराजेंच्या भेटीला; पाहा खास फोटो

गेल्या आठवड्यात जोगीपेठ येथील तरूणाने अचानक ऑटो चालक तरूणाचा घर गाठलं. हा तरूण बेरोजगार असून उदरनिर्वाहासाठी पडेल ती कामं करतो. या तरुणानं ऑटोचालकाच्या पालकांना लग्नाची माहिती दिली.

पालकांनी विचारपूस केली असता ऑटोचालकाने सांगितले की, ते अनेकदा दारू पिण्यासाठी भेटत होते परंतु लग्नाबद्दल त्याने नकार दिला नाही. मात्र ऑटोचालक आणि त्याचे पालक जोगीपेठेतील व्यक्तीला या बेरोजगार तरुणाला त्यांच्या घरात येऊ देण्यास राजी नव्हते.

चंदूरच्या ऑटोचालक तरूणानेही जोगीपेठच्या तरुणाला त्याच्या घरात जाऊन एकत्र राहण्यास नकार दिला. तेव्हा त्या तरूणानं थेट पोलिस स्टेशन गाठलं. परंतु काही काळानंतर ही तक्रार परत घेण्यात आली.

Male Married after drinking
ट्रक ड्रायव्हरला महिन्याला 6 लाख रुपये पगार देते ही कंपनी; तुम्ही कराल का ही नोकरी?

या विचित्र प्रकाराबद्दल बोलताना पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद घौस यांनी TOI ला सांगितले, "दोन्ही बाजूंच्या कुटुंबांना या समस्येबद्दल भीती वाटत होती. त्यांनी आपापसात चर्चा केली आणि समस्या सोडवली." दोन्ही पक्षांनी हे प्रकरण कसे मिटवले हे पोलिसांनी उघड केले नाही.

जोगीपेटच्या तरुणानं सांगितले की, जर त्याला १ लाख रुपये दिले तर तो ऑटो चालक पुरुषासोबत राहण्याचा आग्रह धरणार नाही, असे वृत्त TOI ने दिले आहे. त्याला 10,000 रुपये देण्यात आल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com