Shiv Sena Case Supreme Court : शिंदेंच्या वकिलांच्या युक्तिवादात पहिल्याच वाक्यात बाळासाहेबांचं नाव, शिवसेनेच्या सुनावणीत जबरदस्त क्लायमॅक्स?

Shiv Sena Case : शिवसेना प्रकरणाच्या सुनावणीत शिंदेंच्या वकिलांनी युक्तिवादाच्या सुरुवातीलाच बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला. नेमका काय युक्तिवाद झाला?
Shiv Sena Case Supreme Court eknath shinde uddhav thackeray

Shiv Sena Case Supreme Court eknath shinde uddhav thackeray

esakal

Updated on

Eknath Shinde Lawyer : आजपासून पुन्हा सुरू झालेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावरील सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेना नेमकी उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची, यावर सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू आहेत. या सुनावणीत एकनाथ शिंदे यांच्या बाजूने ज्येष्ठ अधिवक्ता नीरज किशन कौल यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य असल्याचा जोरदार युक्तिवाद केला.

‘निवडणूक आयोगाचा निर्णय योग्यच’; शिंदे गटाचा सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद

शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी निवडणूक आयोगाला राजकीय पक्षाची घटना आणि पक्षातील बहुमताचा विचार करण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयात सांगितले. बाळासाहेब ठाकरे हयात असतानाही निवडणूक आयोगाने हा अधिकार वापरला होता, असा दावा त्यांनी केला.

१९९९ मध्ये शिवसेनेची पक्षघटना निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आली होती. त्यावेळी आयोगाने पक्षघटनेत काही बदल करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचना बाळासाहेब ठाकरे यांनी मान्य केल्या होत्या. त्यामुळे निवडणूक आयोगाचे अधिकार शिवसेनेने त्यावेळीच मान्य केले होते, असा युक्तिवाद कौल यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com