भाजपचे मिशन इलेक्शन; गोवा, युपीत आज होणार आश्वासनांची खैरात

goa an up election 2022
goa an up election 2022
Summary

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशात तर नितिन गडकरी हे गोव्यात आज जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत.

देशातील पाच राज्यात निवडणुकांसाठी मतदान अवघ्या दोन दिवसांवर आले आहे. यात आता भाजप दोन राज्यातील जाहीरनामे आज प्रसिद्ध करणार आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) निवडणुकीसाठी 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मतदानाच्या दोन दिवस आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) लखनऊमध्ये भाजपचा (BJP) जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. 'लोक कल्याण संकल्प पत्र' असा भाजपचा जाहीरनामा असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityannath), युपी निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांच्यासह इतर वरिष्ठ नेते उपस्थित असणार आहेत. तर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) गोवा विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत.

भाजप त्यांचा जाहीरनामा ६ फेब्रुवारीला प्रसिद्ध करणार होते. मात्र भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे निधन झाल्यानंतर भाजपने त्यांचे कार्यक्रम रद्द केले होते. त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपने त्यांच्या जाहीरनाम्याच्या प्रसिद्धीची तारीख पुढे ढकलली होती. अवघ्या काही दिवसांवर मतदानाची तारीख आली असून भाजप जाहीरनाम्यातून काय आश्वासने देणार याकडे लक्ष लागलं आहे. नितिन गडकरी यांच्यासही गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस हेसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

goa an up election 2022
तुम्ही हे पाहिलं नाही का? PM मोदींना काँग्रेस खासदाराचा सवाल

उत्तर प्रदेशातील २०१७ ची स्थिती?

गेल्या विधानसभेला म्हणजेच २०१७ मध्ये भाजपने ३१२ जागा जिंकल्या होत्या. तसंच ४०३ जागा असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने जवळपास ४० टक्के मते मिळवली होती. भाजपनंतर सर्वाधिक ४७ जागा समाजवादी पक्षाला जिंकता आल्या होत्या. तर बसपाचे १९ आणि काँग्रेसचे फक्त ७ उमेदवार जिंकले होते.

गोव्यात गेल्यावेळी काय झाले?

२०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक १७ जागा जिंकल्या होत्या. मात्र त्यांना सरकार स्थापन करता आलं नाही. भाजपने १३ जागा जिंकून इतर पक्षांसोबत आघाडी केली. मनोहर पर्रीकर यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनानंतर आता प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री आहेत. गोव्यात १४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com