Does sharing election CCTV footage violate voter privacy? : निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांचे वोटचोरीचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच राहुल गांधी यांनी केलेली सीसीटीव्ही फुटेज मागणीही चुकीची असल्याचे ते म्हणाले. निवडणुकीचं सीसीटीव्ही फुटेज दिल्याने मतदारांचा खासगीपणा धोक्यात येईल, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज दिल्यास खरंच मतदारांची प्राव्हसी धोक्यात येते का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.