esakal | 'विकास इंजिन'ची तिसरी यशस्वी चाचणी, एलॉन मस्क यांनी केलं 'इस्रो'चं अभिनंदन
sakal

बोलून बातमी शोधा

ISRO

'विकास इंजिन'ची तिसरी यशस्वी चाचणी, एलॉन मस्क यांनी केलं 'इस्रो'चं अभिनंदन

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: भारतीय वैज्ञानिकांनी काल विकास इंजिनची (Vikas Engine) तिसरी यशस्वी चाचणी केली. या कामगिरीबद्दल प्रसिद्ध संशोधक, उद्योजक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) (isro) वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे. भारताच्या महत्त्वकांक्षी 'मिशन गगनयान' (Gaganyaan Mission) मध्ये या विकास इंजिनचा वापर करण्यात येणार आहे. (Elon Musk congratulates Isro for successfully conducting third test on Vikas Engine for Gaganyaan Mission)

एलॉन मस्क इलेक्ट्रीक कार निर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या टेस्ला कंपनीचे संस्थापक आहेत. त्याशिवाय मस्क यांनी अवकाश संशोधनासाठी 'स्पेस एक्स' नावाची कंपनी स्थापन केली आहे. 'स्पेस एक्स' अवकाशात पाठवण्यासाठी रॉकेटची निर्मिती करते. तामिळनाडू महेंद्रगिरीमध्ये इस्रोच्या प्रोप्लशन कॉम्पलेक्स परीक्षण केंद्रात ही चाचणी झाली.

हेही वाचा: मुंबईत पुन्हा एकदा जमावबंदीचा आदेश लागू

यावेळी विकास इंजिन २४० सेकंदांसाठी प्रज्वलित करण्यात आले होते. इंजिन चाचणीमध्ये ठरवलेली सर्व उद्दिष्टय पूर्ण झाली. अंदाजित सर्व निकषांच्या दृष्टीने ही चाचणी परिपूर्ण होती, अशी माहिती इस्रोने अधिकृत निवेदनात दिली आहे.

हेही वाचा: ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांवर नर्सने केला विनयभंगाचा आरोप

'मिशन गगनयान'साठी चार भारतीय अवकाशवीरांची निवड करण्यात आली असून, रशियामध्ये त्यांचं प्रशिक्षण सुरु आहे. १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मिशन गगनयान'ची घोषणा केली होती.

loading image