esakal | अनंतनाग: सुरक्षारक्षक व दहशतवाद्यांमध्ये चकमक
sakal

बोलून बातमी शोधा

अनंतनाग: सुरक्षारक्षक व दहशतवाद्यांमध्ये चकमक

अनंतनाग जिल्ह्यातील देलगाम गावात चार दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी गावात शोधमोहिम सुरु केली. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात गावातील एका महिलेचा मृत्यू झाला.

अनंतनाग: सुरक्षारक्षक व दहशतवाद्यांमध्ये चकमक

sakal_logo
By
वृत्तसंस्था

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील देलगाम गावात आज (शनिवार) सकाळी सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत एका महिलेचा मृत्यू झाला असून, दहशतवाद्यांना घेरण्यात आले आहे.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यातील देलगाम गावात चार दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी गावात शोधमोहिम सुरु केली. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात गावातील एका महिलेचा मृत्यू झाला. सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू असून, सुरक्षारक्षक दहशतवादी लपलेले घर उडवून देण्याच्या तयारीत आहेत.

या गावात लपलेल्या चार दहशतवाद्यांमध्ये लष्करे तैयबाचा कमांडर बशीर लष्करी याचाही सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. बशीर हा भारतीय लष्कराविरोधात करण्यात आलेल्या अनेक कारवायांमध्ये सहभागी होता. त्यामुळे त्याला ठार मारण्याच्या तयारीत लष्कर आहे. सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये अद्याप चकमक सुरु आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
पुतनामावशीची कणव
'जीएसटी' देशभरात लागू; संसदेत ऐतिहासिक सोहळा​
'जीएसटी': सामान्य माणसास अल्पकाळ बोचणारा!​
धुळ्यातील शेतकऱ्यांनी कमी खर्चात तयार केले मोटरसायकलचे कोळपे​
धुळे जिल्ह्यात भावी शिक्षकांची 'डीएड'कडे पाठ
असाही एक शिक्षणाच्या भक्तीचा मार्ग (वारीच कोंदण)​
भारताचा विंडीजवर 93 धावांनी विजय; मालिकेत 2-0 ने आघाडी​
‘सीएम’चा ‘पिंपळ’ बकरीने खाल्ला​
'जीएसटी'ला तमाशाचे स्वरूप : राहुल गांधी​

loading image