धक्कादायक : देशात लॉकडाउननं घेतला ३०० जणांचा बळी; भितीतून आत्महत्येच्याही घटना

वृत्तसंस्था
Friday, 8 May 2020

दारू न मिळाल्याने सात जणांनी आफ्टर शेव लोशन आणि सॅनिटायजरचे प्राशन केले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे देशभरात लॉकडाउन सुरू असून यादरम्यान झालेल्या दुर्घटनेत सुमारे ३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यमागे कोरोना संसर्ग नाही तर अन्य कारणे असल्याचे संशोधनातून निष्पन्न झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हे संशोधन २ मेपर्यंत असून त्यानंतरही काही नागरिकांचा कोणत्या ना कोणत्या कारणाने मृत्यू झाला आहे. आजच औरंगाबाद येथे रेल्वेच्या धडकेने १६ हून अधिक मजुरांचा मृत्यू झाला आहे. हे मजूर मध्यप्रदेशातील होते. 

- किम जोंग उन आहेत जिवंत; हा आहे पुरावा!

संशोधकांच्या गटात जनहित तज्ञ तेजेश जीएन, सामाजिक कार्यकर्त्या कनिका शर्मा, जिंदल ग्लोबल स्कूल ऑफ लॉ चे सहायक प्रोफेसर अमन यांचा समावेश आहे. १९ मार्च ते २ मेपर्यंत देशभरात विविध ठिकाणी आणि घटनांत ३३८ जणांचा मृत्यू झाला आहे. संशोधकांच्या मते, संसर्गाच्या भीतीने, एकटेपणाला घाबरुन आणि प्रवासावर बंदी घातल्याने अनेकांनी आत्महत्या केली आहे.

- संतापजनक : पुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांना 'असा' दाखवला जातोय घरचा रस्ता

उदाहरणार्थ. दारू न मिळाल्याने सात जणांनी आफ्टर शेव लोशन आणि सॅनिटायजरचे प्राशन केले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. विलगीकरणात राहणाऱ्या मजुरांनी संसर्गाच्या भीतीने किंवा कुटुंबापासून दूर राहिल्याने निराश होऊन आत्महत्या केली किंवा त्यांचा धास्तीने मृत्यू झाला. या आकडेवारीसाठी वर्तमानपत्र, वेब पोर्टल आणि सोशल मीडियाचा आधार घेतल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

आणखी वाचा - लॉकडाउनचा सर्वांत मोठा फटका पुण्याला

लॉकडाउनमुळे वाहतूक बंद राहिल्याने आणि राज्याच्या सीमा सील केल्याने स्थलांतरित मजुरांची स्थिती शोचनिय झाली. त्यामुळे काही मजूर पायी, सायकलवरुन किंवा दुचाकीवरून निघाले. गेल्या महिन्यात तेलंगणात काम करणारे छत्तीसगडचे कुटुंब पायीच गावी निघाले. परंतु वाटेत त्यांच्या लहानग्या मुलीचा मृत्यू झाला. अतिथकव्यामुळे आणि सतत चालल्याने त्या मुलीचा मृत्यू झाला. मृतांत स्थलांतरित मजुरांचे प्रमाण लक्षणीय आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कारण मृतांची संख्या
आत्महत्या ८० 
रस्ता अपघात ५१ 
भेसळयुक्त दारू ४५
भूक किंवा चणचण ३६

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Escaped coronavirus but lockdown killed over 300 in India