
नवी दिल्ली - फेसबुकच्या सुरक्षा टीमकडून संभाव्य धोकादायक संघटना म्हणून टॅग केल्यानंतरही भारतात अल्पसंख्यांकाविरोधात हिंसेचं समर्थन करणाऱ्या बंजरंग दलाबाबत फेसबुकची नरमाईची भूमिका असल्याचं वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने प्रकाशित केलं आहे. केवळ राजकीय आणि सुरक्षेच्या कारणामुळे बजरंग दल सोशल मीडिया नेटवर्कवर असल्याचा दावाही यामध्ये करण्यात आला आहे.
द वॉल स्ट्रीट जर्नलने रविवारी वृत्त प्रकाशित केले असून त्यात म्हटलं आहे की, भाजपसोबत संबंध असल्यानं बजरंग दलाविरोधात कारवाई करण्यास फेसबुक घाबरते. कारण बजरंग दलावर कारवाई केल्यास कंपनीला भारतात व्यावसायिकदृष्ट्या आणि कर्मचाऱ्यांनाही धोका निर्माण होऊ शकतो. वॉल स्ट्रीट जर्नलने याआधीच्या त्यांच्याच रिपोर्टचा दाखला यामध्ये दिला आहे.
ऑगस्टमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये फेसबुक भाजप नेत्यांच्या हेटस्पीच किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोस्टकडे कानाडोळा करत असल्याचं म्हटलं होतं. त्यात फेसबुकच्या माजी एक्झिक्युटीव्ह अंखी दास यांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोपही करण्यात आला होता. ऑगस्टमध्ये रिपोर्ट पब्लिश झाल्यानंतर काही दिवसांनी फेसबुकने संबंधित नेत्याचे खाते बॅन केले होते. मात्र कंपनीवर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या नव्या रिपोर्टमध्ये बजरंग दलाचा एक व्हिडिओ आणि त्याच्यावर फेसबुकने केलेल्या कारवाईचा दाखला दिला आहे. यामध्ये जून महिन्यात नवी दिल्लीत एका चर्चवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचा दावा करण्यात आला होता. हा व्हिडिओ अडीच लाख वेळा पाहिला गेला होता.
वॉल स्ट्रीज जर्नलने केलेल्या दाव्यानुसार फेसबुकच्या एका इंटर्नल रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, भारतातील सत्ताधारी हिंदू राष्ट्रवादी नेते, बजरंग दलावर बंदी घातल्यास फेसबुक कर्मचाऱ्यांवर किंवा कंपनीला मिळणाऱ्या सुविधांवर हल्ला होण्याचा धोका आहे. फेसबुकच्या कर्मचाऱ्यांच्या एका गटाने एक पत्रही फेसबुक डिस्कशन ग्रुपमध्ये पोस्ट केलं होतं. त्यानुसार या प्लॅटफॉर्मवर इतर संघटनांच्या तुलनेत बजरंग दलाच्या हेटस्पीचला काढून टाकण्यासाठी कंपनीकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे.
दरम्यान, वॉल स्ट्रीट जर्नलला फेसबकुचे प्रवक्ते अँडी स्टोन यांनी सांगितलं की, आम्ही जागतिक पातळीवर राजकीय परिस्थिती किंवा पक्षाशी कोणत्याही प्रकारचे भेदभाव न करता व्यक्ती आणि संघटनांबाबत आमचे नियम लागू करतो. फेसबुककडून त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले असले तरी त्यांनी हेसुद्धा मान्य केलं होतं की हेटस्पीचबाबत त्यांना अजुन चांगल्या पद्धतीने काम करण्याची गरज आहे.
फेसबुकने ऑक्टोबर महिन्यात भारतात अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. देशात पाच कार्यालये असून भारतातील युजर्स हे त्यांच्यासाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहेत. फेसबुकने संसदीय समितीसमोर हजर झाल्यानंतर स्वत:वर झालेल्या आरोप फेटाळून लावले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.