अन् तिच्या अश्रूंचा फुटला बांध...

वृत्तसंस्था
Friday, 5 June 2020

वडिलांचे दीर्घ आजाराने निधन झाले. पण, यावेळी मुलगी क्वारंटाइन सेंटरमध्ये होती. वडिलांचे अंत्यदर्शन घेऊ देण्याची विनंती केल्यानंतर तिला तिन मिनिटे देण्यात आली. पण, वडिलांचा चेहरा पाहिल्यानंतर तिच्या अश्रूंचा बांध फुटला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इंफाळ (मणिपूर): वडिलांचे दीर्घ आजाराने निधन झाले. पण, यावेळी मुलगी क्वारंटाइन सेंटरमध्ये होती. वडिलांचे अंत्यदर्शन घेऊ देण्याची विनंती केल्यानंतर तिला तिन मिनिटे देण्यात आली. पण, वडिलांचा चेहरा पाहिल्यानंतर तिच्या अश्रूंचा बांध फुटला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कोरोनाच्या संकटात सापडली सोन्याची खाण!

कांगपोक्पी येथे राहणारी अंजली (वय 22) 25 मे रोजी श्रमिक स्पेशल ट्रेनमार्गे चेन्नईहून इंफाळ येथे आली. ट्रेनमध्ये अंजलीचा सहकारी प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्यानंतर, तिलाही क्वारंटाईन करण्यात आले. अंजलीचे वडील बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. यानंतर आरोग्य प्रशासनाकडून रितसर परवानगी घेतल्यानंतर आणि पीपीई किट परिधान केल्यानंतरच अंजलीला तिच्या वडिलांचे अंत्यदर्शन घेण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, तिला फक्त वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी तीन मिनिटे दिली होती. वडिलांचे अंत्यदर्शन घेताना अंजलीचे अश्रू अनावर झाले आणि अंजली धाय मोकलून रडू लागली.

जिल्हाधिकारी कार्यालयातच महिलेवर केला बलात्कार...

वडिलांच्या मृतदेहाजवळ जाऊन त्यांना निरोप देत असताना तिची आई, नातेवाईक किंवा इतरांजवळ जाण्याची तिला परवानगी नव्हती. त्यामुळे अंजली समोर रडत असताना तिच्याकडे पाहण्याशिवाय काहीच करता येत नव्हते. पण, यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांचे सर्व लक्ष मात्र घड्याळाकडे होते. तीन मिनिटे पूर्ण होताच तिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी तिला क्वारंटाईन सेंटरमध्ये नेले. बुधवारी अंजलीच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नवरदेव वाजत-गाजत आला नवरीच्या दारात पण...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus manipur girl gets 3 minutes to say last goodbye to father video viral