बागपतमध्ये पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये, रात्री उशिरा शेतकऱ्यांचे आंदोलन उधळून लावले

police main.png
police main.png

नवी दिल्ली- दिल्लीत ट्रॅक्टर परेडवेळी झालेल्या हिंसाचारानंतर पोलिस प्रशासनाने मोठी कारवाई करत सुमारे 40 दिवसांपासून सुरु असलेले शेतकरी आंदोलन जबरदस्तीने संपवले. पोलिसांनी दिल्ली-सहारनपूर महामार्गावर एका बाजूला बसलेल्या शेकडो शेतकऱ्यांना घटनास्थळावरुन पळवून लावताना त्यांचे तंबू पाडले आणि लाठीचार्जही केल्याचा आरोप आहे. घटनास्थळी तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

बडोतमध्ये कृषी कायद्याविरोदात सुमारे 40 दिवसांपूर्वी खाप चौधरी सुरेंद्रसिंह यांच्या नेतृत्त्वाखाली धरणे सुरु केले होते. नंतर सुरेंद्र सिंह या आंदोलनात एकटे पडले होते. सुरेंद्र सिंह यांना हटवल्यानंतर दुसऱ्या खापच्या चौधरीनी या आंदोलनाचे नेतृत्त्व केले. हळूहळू अनेक शेतकरी संघटनांबरोबर खाप चौधरी सुरेंद्र सिंह पुन्हा एकदा आंदोलनस्थळी परतले. प्रजासत्ताक दिनी बडोत येथील आंदोलनस्थळी शेकडो शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत गेले होते. दिल्लीतील घटनेनंतर बुधवारी दुपारपर्यंत बहुतांश शेतकरी दिल्लीतून आपापल्या गावी आणि आंदोलनस्थळी परतले होते. 

बुधवारी संपूर्ण दिवस उपजिल्हाधिकारी अमितकुमार सिंह आणि सहाय्यक पोलिस अधिक्षक मनीष मिश्र यांनी शेतकऱ्यांबरोबर आंदोलन बंद करण्यासाठी चर्चा केली. परंतु, शेतकरी आपल्या मागणीवर अडून बसले. पोलिस प्रशासनाचे अधिकारी रात्री 11 वाजता मोठा फौजफाटा घेऊन आंदोलनस्थळी दाखल झाले आणि त्यांनी बळाच्या जोरावर ते आंदोलन उधळून लावले. यावेळी पोलिस अधिक्षक अभिषेक सिंह, एसडीएम दुर्गेश मिश्र, सीओ आलोक सिंह आदी उपस्थित होते. याप्रकरणी एसपी अभिषेक यांनी माध्यमांशी बोलणे टाळल्याचे सांगण्यात येते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com