Farmers Protest : 'चंपारण्य सत्याग्रहा'शी केली तुलना; राहुल गांधींनी PM मोदींवर डागलं टीकास्त्र

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 January 2021

राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वीच नव्या वर्षाच्या शुभारंभा प्रसंगी म्हटलं होतं की, ते अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या शेतकऱ्याच्या सोबत आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनवरुन पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलंय की, भारतात पुन्हा एकदा गुलामीची परिस्थिती आहे. तसेच भारतातील शेतकरी चंपारण्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा भोगत आहे. राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांचं दु:ख मांडत मोदी सरकारव टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी म्हटलंय की, देश पुन्हा एकदा चंपारण्य सारख्या संकटाला सामोरे जावं लागत आहे. तेंव्हा त्या काळात ब्रिटश कंपनी वरचढ होती आणि आता मोदींच्या मित्र असलेल्या कंपन्या वरचढ आहेत. मात्र सध्याच्या आंदोलनातील प्रत्येक शेतकरी-कामगार जो सत्याग्रही आहे तो आपला अधिकार घेतल्याशिवाय राहणार नाहीये. 

राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वीच नव्या वर्षाच्या शुभारंभा प्रसंगी म्हटलं होतं की, ते अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या शेतकऱ्याच्या सोबत आहेत. 1 जानेवारीला कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा उल्लेख करत त्यांनी ट्विट केलं होतं की, मी मन:पूर्वक आणि सन्मान करत अन्यायाशी लढणाऱ्या शेतकरी आणि कामगारांसोबत आहे. सर्वांना नववर्षाच्या सदिच्छा. आणि आता दोन दिवसांनंतर त्यांनी ब्रिटीश काळातील चंपारण्यातील शेतकऱ्यांची तुलना आजच्या आंदोलक शेतकऱ्यांशी केली आहे. 

हेही वाचा - "दोन्ही लशी 'मेड इन इंडिया' याचा अभिमान; देश कोविड योद्ध्यांच्या ऋणात राहील"

बिहारमधील चंपारण्यमध्ये निळीची शेती केली जायची. यासाठी ब्रिटीशांनी शेतकऱ्यांवर जुलुम चालवला होता. या जुलुमाविरोधात 1917 साली महात्मा गांधी यांनी सत्याग्रह केला होता. इतिहासात हा सत्याग्रह चंपारण्यचा निळीचा सत्याग्रह म्हणून ओळखला जातो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Protest rahul gandhi slams narendra modi government