माझा नवरा चार मुलांचा बाप अन् त्याला पळवतेस...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

तीन मुलांची आई असलेल्या महिलेचे चार मुलांचा बाप असलेल्या नागरिकाशी प्रेमसंबंध जुळले. दोघांनी घर सोडून पळ काढला आणि एकत्र राहू लागले. पण, प्रेयसीच्या नवऱयाने दोघांवर हल्ला करत जखमी केले. या घटनेत प्रेयसी-प्रियकर गंभीर जखमी झाले आहेत.

रायपूर (छत्तीसगड): तीन मुलांची आई असलेल्या महिलेचे चार मुलांचा बाप असलेल्या नागरिकाशी प्रेमसंबंध जुळले. दोघांनी घर सोडून पळ काढला आणि एकत्र राहू लागले. पण, प्रेयसीच्या नवऱयाने दोघांवर हल्ला करत जखमी केले. या घटनेत प्रेयसी-प्रियकर गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिस अधिकाऱयाच्या मुलीला म्हणाला; चल लॉजवर...

ईश्वरी नावाच्या महिलेचे आठ वर्षांपूर्वी नरेंद्र सोबत विवाह झाला होता. दोघांना दोन मुलगे व एक मुलगी आहे. ईश्वरीची दयासागर सोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दयासागरला चार मुले आहेत. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर पळून जाण्याचा निर्णय घेतला. दोघांनी पळून जाऊन विवाह केला व रायपूरमध्ये राहू लागले.

प्रेयसी म्हणाली, नवऱयाला आताच झोपवलाय...

दयासागरच्या पत्नीनेही आम्हाला चार मुले आहेत, माझ्या पतीला आमच्याकडे येऊ दे म्हणून ईश्वरीसोबत भांडण केले. पण, दयासागर ईश्वरीला सोडायला तयार नव्हता. ईश्वरीच्या पतीने आपल्या पत्नीला पुन्हा घरी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण, ईश्वरी घरी यायला तयार नव्हती. अखेर ईश्वरीच्या पतीने पत्नीचा खून करण्याचे ठरवले. धारदार वस्तू घेऊन तो ईश्वरीकडे गेल्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. ईश्वरीवर त्याने हल्ला करत गंभीर जखमी केले. ईश्वरीला वाचविण्यासाठी दयासागर मध्ये पडल्यानंतर त्याच्यावरही हल्ला केला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मालक म्हणाला, माझ्या पत्नीसोबत प्रेम कर अन्...

दोघांवर हल्ला केल्याप्रकरणी ईश्वरीच्या पहिल्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दयासागरने ईश्वरीच्या तीन मुलांना सांभाळण्याची तयारी आहे, पण पहिला पती मुलांना देत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसावर जडले मेव्हणीचे प्रेम अऩ्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: father of four child marry with mother of three child in raipur