
Rekha Sharma Controversial Song Video : ऑपरेशनं सिंदूनंतर जगभरात भारताची बाजू मांडण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ विविध देशांमध्ये गेले आहेत. पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. याच विविध शिष्टमंडळांचे भारताची बाजू मांडतानाचे भाषणांचे व्हिडिओ समोर येत आहेत.
पण यातच एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यात रेखा शर्मा बॉलिवूडचं गाण गाताना दिसत आहेत. यावरुन आता काँग्रेस आक्रमक झाली आहे. तसंच सोशल मीडियातूनही या व्हिडिओ जोरदार टीका सुरु झाली आहे.