अमित शाहांचा IAS सिंघल सोबत फोटो शेअर करणं महागात, दिग्दर्शकावर गुन्हा दाखल

Director Avinash Das
Director Avinash Dase sakal

अहमदाबाद : नुकतीच मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या झारखंड कॅडरच्या आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांच्यासोबत फोटो शेअर करणे दिग्दर्शकाला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी गुजरात पोलिसांनी (Gujrat Police) दिग्ददर्शक अविनाश दास यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Director Avinash Das
'अमित शाह पंतप्रधान, मोदी गृहमंत्री', भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

दास (४६) यांनी ८ मे रोजी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक छायाचित्र शेअर केले होते. यामध्ये अमित शाह आणि पूजा सिंघल पाच वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात एकत्र दिसले होते. लोकांची दिशाभूल करून मंत्र्यांची प्रतिष्ठा घालविण्यासाठी त्याने हा फोटो पोस्ट केला होता, असं अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस अधीक्षक एचएम व्यास यांनी सांगितले. दास यांच्यावर 17 मार्च रोजी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर मॉर्फ केलेले चित्र शेअर करून राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एक महिला तिंरगा परिधान केलेली दिसत आहे. 8 मे रोजी ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोच्या संदर्भात भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 469 (फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या कलम 67 अंतर्गत दासवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच फेसबुकवर शेअर केलेल्या फोटोच्या संदर्भात 'प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल प्राइड अॅक्ट' आणि आयटी अॅक्टच्या कलमांखाली दासविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी झारखंडच्या IAS अधिकारी पूजा सिंघल यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) निधीच्या कथित अपहाराप्रकरणी अटक केली. दास यांनी 2017 मध्ये स्वरा भास्कर, संजय मिश्रा आणि पंकज त्रिपाठी यांची भूमिका असलेल्या 'अनारकली ऑफ अरह' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com