अयोध्येत गोळीबार; भाजपच्या नेत्यासह दोघांची हत्या

वृत्तसंस्था
Monday, 18 May 2020

पलिया प्रताप शाह गावात ग्राम प्रधान जय प्रकाश सिंह आणि राम पदारथ यादव उर्फ नन्हा यादव यांच्यामध्ये भांडण झाले. भांडणादरम्यान दोघांनी एकमेकांवर गोळ्या झाडल्या असून, दोघांचाही मृत्यू झाला आहे. जयप्रकाश सिंह हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते.

अयोध्या (उत्तर प्रदेश) : पलिया प्रताप शाह गावात ग्राम प्रधान जय प्रकाश सिंह आणि राम पदारथ यादव उर्फ नन्हा यादव यांच्यामध्ये भांडण झाले. भांडणादरम्यान दोघांनी एकमेकांवर गोळ्या झाडल्या असून, दोघांचाही मृत्यू झाला आहे. जयप्रकाश सिंह हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते.

जीवाच्या आकांताने किंचाळी फोडली पण...

जय प्रकाश सिंह आणि राम पदारथ यादव उर्फ नन्हा यादव यांच्यामध्ये पूर्वीपासून भांडण होते. सोमवारी (ता. 17) दोघांमध्ये पुन्हा भांडण सुरू झाले. भांडणादरम्यान दोघांनी एकमेकांवर गोळ्या झाडल्या. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. गोळीबाराची माहिती समजताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून, शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

...म्हणून चोरली सायकल; माफीनामा व्हायरल

जयप्रकाश सिंह हे भाजप खासदार लल्लू सिंह यांचे निकटवर्तीय होते. या घटनेबाबत माहिती मिळताच लल्लू सिंहदेखील घटनास्थळी दाखल झाले. गोळीबाराच्या  घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, अयोध्यात गोळीबाराची दुसरी घटना घडली. यात महराजगंज भागात दोन दिवसांपूर्वी मंशाराम यादव यांची गोळी घालून हत्या करण्यात आली आणि मृतदेह रेतीमध्ये लपवून ठेवला. पोलिसांना आज त्यांचा मृतदेह सापडला. अयोध्येत झालेल्या या गोळीबारामुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: firing in ayodhya killing of two including bjp leader