esakal | काश्मीरः दहशतवाद्यांचा मशिदीवर ताबा, चकमक सुरु; तिघांचा खात्मा
sakal

बोलून बातमी शोधा

Terrorist main.jpg

नौबाग येथे सकाळी 8 च्या सुमारास चकमक सुरु झाली. या संपूर्ण परिसराचा सुरक्षा दलांनी ताबा घेतला आहे.

काश्मीरः दहशतवाद्यांचा मशिदीवर ताबा, चकमक सुरु; तिघांचा खात्मा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

श्रीनगर- जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. शुक्रवारी सकाळी अवंतीपुरातील त्राल येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. या परिसरात अजूनही ऑपरेशन सुरु असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने पोलिस महासंचालकांच्या हवाल्याने दिले आहे. शोपियांमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. शोपियामध्ये गुरुवारी संध्याकाळपासून चकमक सुरु आहे. मशिदीच्या आत दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर ऑपरेशन सुरु झाले. मशिदीचे इमाम आणि आत लपून बसलेल्या एका दहशतवाद्याच्या भावाला आत पाठवून आत्मसमर्पण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अजूनही चकमक सुरु असून मशिदीचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

नौबाग येथे सकाळी 8 च्या सुमारास चकमक सुरु झाली. या संपूर्ण परिसराचा सुरक्षा दलांनी ताबा घेतला आहे. मोठ्याप्रमाणात शोध मोहीमही सुर आहे. अद्याप सविस्तर वृत्त हाती आलेले नाही. 

शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये तब्बल 12 तास चकमक सुरु होती. यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आणखी दोन दहशतवादी मशिदीच्या आत लपून बसलेले आहेत. 

हेही वाचा- पुणेकरांनो सावधान! ‘व्हेंटिलेटर’ बेड शिल्लकच नाहीत; दिवसभरात वाढलेत 12 हजार रुग्ण

हे सर्व दहशतवादी बंदी घातलेल्या अन्सर गहजवत उल हिंद (जेइएम) या संघटनेचे असल्याचे सांगण्यात येते. परंतु, मृत पावलेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. मशिदीचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे काश्मिर झोनच्या पोलिसांनी सांगितले. 

हेही वाचा- धक्कादायक! चीनच्या लॅबमध्ये कोरोनापेक्षाही धोकादायक व्हायरस; तांदूळ आणि कापसामुळे खुलासा

loading image
go to top