करहलमध्ये पुन्हा मतदान घ्या; अखिलेश विरोधातील भाजप उमेदवाराची मागणी

काल युपीच्या तिसऱ्या टप्प्यात या मतदारसंघात मतदान पार पडलं....पण या ठिकाणी काय घडलं जाणून घ्या...
SP Singh Baghel and akhilesh Yadav
SP Singh Baghel and akhilesh YadavSP Singh Baghel and akhilesh Yadav

नवी दिल्ली : UP Election 2022 : समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) हे निवडणूक लढवत असलेल्या करहल मतदारसंघात काल मतदान पार पडलं. या मतदार संघातील अनेक केंद्रं ताब्यात (Booth Capturing) घेतल्याचा आरोप भाजपचे उमेदवार एस. पी. सिंह बघेल (SP Singh Baghel) यांनी केला असून या ठिकाणी पुन्हा मतदान घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) केली आहे. (UP Election 2022 SP Singh Baghel Demands to Conduct repolling In Karhal)

SP Singh Baghel and akhilesh Yadav
लालू प्रसाद यादवांना दणका! पाच वर्षांचा कारावास, 60 लाखांचा दंड

समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ६४ ठिकाणी बूथ कॅप्चरिंग, फेक मतदान तसेच मतदारांना धमकावल्याचा आरोप निवडणूक आयोगाकडे केला आहे. याचा पुरावा म्हणून त्यांनी बूथ क्रमांक ११० वरील एक व्हिडिओही पाठवला आहे. या मतदान केंद्रावर अनेक महिलांना उभं करुन सातत्यानं मतदान करायला भाग पाडलं.

SP Singh Baghel and akhilesh Yadav
मोदी सरकार 'मराठी'ला अभिजात भाषेचा दर्जा देणार का? सुभाष देसाई म्हणतात...

यापूर्वी १९७ मध्ये झालं होतं सर्वाधिक मतदान

करहल विधानसभा मतदारसंघ १९५१ मध्ये दोन भागात वाटला गेला होता. त्यानंतर १९५७ मध्ये हे दोन्ही भाग एकत्र करण्यात आला. यानंतर १९६९ पर्यंत हा मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी आरक्षित होता. या जागेवर सन १९७४ मध्ये सर्वाधिक ७१.४१ टक्के मतदान झालं होतं. उस समय भारतीय क्रांती दलाच्या नाथू सिंह यांचा या जागेवर विजय झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com