बिहारमध्ये पूरस्थिती कायमच

सोळा जिल्हे बाधित; यूपीत गंगेची नदीची पातळी वाढलेली
bihar
biharsakal

पाटणा : बिहारमध्ये नदीची पाणीपातळी वाढल्याने सुमारे पाच लाख लोकांना फटका बसला आहे. तसेच काल पूरग्रस्त जिल्ह्यांची संख्या १५ वरून १६ वर पोचली. पूर्णियातील काही विभागात पूर आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. बिहार सरकारने मदतकार्य वेगाने राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. पूरग्रस्तांसाठी तातडीने अर्थसाह्य म्हणून प्रत्येक कुटुंबाला सहा हजार रुपये मदत दिली जात आहे. यानुसार मंगळवारपर्यंत २३ हजार ८९९ कुटुंबांना आर्थिक मदत केली असून यानुसार १३४.३४ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. (Bihar News)

bihar
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीसंदर्भात उपमुख्यमंत्र्याची घोषणा

आपत्तीव्यवस्थापन विभाग पूरग्रस्त जिल्ह्यातील स्थितीवर लक्ष ठेवून आहे. प्रमुख नद्यांच्या पातळीवर जलसंपदा विभागाचे अभियंते सतत लक्ष देत असल्याचे सांगण्यात आले. पूरग्रस्त भागात अत्यावश्‍यक वस्तू, साहित्याचा पुरवठा केला जात आहे. यासाठी २५८५ नौकांची मदत घेतली जात आहे. गरजेनुसार नौकेची संख्या वाढवण्याची सूचना देण्यात आली आहे. या भागात ६८ मदत छावण्या आणि ६२१ सामूहिक स्वयंपाकघर सुरू केले आहेत. या ठिकाणी काल ६ लाख २८ हजाराहून अधिक नागरिकांनी भोजन केल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारकडून आतापर्यंत दोन लाख २२ हजार ८९९ पॉलिथिन चादर आणि १ लाख ४ हजार ५५ रेशनची पाकिटे देण्यात आली. पावसामुळे नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

bihar
तालिबानी राज्यात जगू शकत नाही, अफगाणी विद्यार्थ्यांना राहायचंय पुण्यात

मध्यप्रदेशात राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून मध्य प्रदेशचा पूर हा गेल्या शंभर वर्षातील सर्वाधिक भीषण असल्याचे सांगितले. त्यामुळे राज्यात राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. पावसामुळे भिंड, श्‍योपूर, ग्वाल्हेर, आदी जिल्ह्यांत नुकसान झाले आहे.

बिहारचे १६ जिल्हे पूरग्रस्त

पाटण्याशिवाय वैशाली, भोजपूर, लखीसराय, मुजफ्फरपूर, दरभंगा, खगडिया, सहरसा, भागलपूर, सारण, बक्सर, बेगुसराय, कटिहार, मुंगेर, समस्तीपूर, पूर्णिया जिल्ह्यातील बहुतांश भाग पूरग्रस्त झाला आहे.

bihar
"सणांच्या काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण नको, खबरदारी घ्या"

उत्तर प्रदेशात २४ जिल्ह्यांना फटका

उत्तर प्रदेशात चोवीस जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. गंगा, यमुनासह अनेक नद्यांची पातळी वाढलेलीच आहे. संगमनगरी प्रयागराज येथे गंगा आणि यमुना नदीची पाणी पातळी वाढलेली असल्याने नदीकाठचा भाग पाण्याखाली गेला आहे. शेकडो नागरिक पाण्यात अडकले आहेत. वाराणसीतही गंगा नदीने रौद्र रूप धारण केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com