Coronavirus : कोरोनापासून बचाव करण्यासाठी क्रिकेटच्या देवाने सांगितला मंत्र!

टीम ई-सकाळ
Wednesday, 18 March 2020

सध्या देशात कोरोनाग्रस्तांची संख्या १४७ झाली असून यापैकी १२२ नागरिक हे भारतीय आहेत. तर २५ नागरिक हे परदेशी आहेत.

मुंबई : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे आणि कोरोनाही थांबण्याचे काही नाव घेईना, असे दिसत आहे. आतापर्यंत देशातील १४८ नागरिकांना कोरोना लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

केंद्र सरकार आणि राज्य सरकारने नागरिकांना शक्य तेवढी खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. संपूर्ण जगभरात कोरोना वेगाने पसरत असल्याने जागतिक आरोग्य संघटनाही (WHO) वारंवार नागरिकांना स्वत: काळजी स्वत: घेण्याचे आवाहन करत आहे.

- Coronavirus : देशात कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ; रुग्णांची संख्या...

त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे  #SafeHandsChallenge ही मोहिम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देशभरातील नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी एक मंत्र सांगितला आहे. 

सचिनने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दोन व्हिडिओ पोस्ट केले आहेत. या दोन्ही व्हिडिओमध्ये सचिनने नागरिकांना स्वच्छता बाळगण्यासंबंधीच्या सूचना केल्या आहेत. कोरोनाचा प्रसार क्षणार्धात होत असल्याने आपण स्वत: काळजी घेतली पाहिजे. यासाठी सार्वजनिक ठिकाणी जाणे आणि लोकांच्या भेटीगाठी काही काळासाठी टाळण्यावर भर दिला पाहिजे. शक्यतो आजारी व्यक्तीपासून लांब रहावे आणि स्वत: आजारी असल्यासारखे वाटत असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधण्याच्या सूचना सचिनने नागरिकांना केल्या आहेत.

- Coronavirus : आता आणखी एका राज्यात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

तो पुढे म्हणाला की, कोरोना बरा होत असल्याने घाबरण्याचे काहीच कारण नाही. तसेच अफवांवरही विश्वास ठेवू नका. २० मिनीटे पाण्याने हात धुवा. कोरोनाला आपण पराभूत करू शकतो फक्त आपण सर्वांनी एक होऊन त्याच्याशी लढायला हवे. 

दरम्यान, देशातील जवळपास 54 हजार लोकांना डॉक्टरांच्या सामुहिक देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. कोरोनाने आता संपूर्ण देशाला आपल्या विळख्यात ओढण्यास सुरवात केली आहे. ओडिशा आणि महाराष्ट्रानंतर आता पश्चिम बंगालमध्येही कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे.

- Coronavirus : पुणेकरांना जरा जपून... आणखी एक कोरोनाग्रस्त वाढला!

सध्या देशात कोरोनाग्रस्तांची संख्या १४७ झाली असून यापैकी १२२ नागरिक हे भारतीय आहेत. तर २५ नागरिक हे परदेशी आहेत. लडाख, जम्मू-काश्मीर आणि केरळ या राज्यांत प्रत्येकी नवा एक रुग्ण आढळून आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Indian Cricketer Sachin Tendulkar joins WHO Safe Hands Challenge