esakal | भाजपच्या माजी मंत्र्याने ग्रुपवर पाठवला अश्लील व्हिडिओ...
sakal

बोलून बातमी शोधा

former minister kalu lal gurjar has sent obscene video bjps whatsapp group at rajasthan

भारतीय जनता पक्षाच्या एका माजी मंत्र्याच्या मोबाईलवरून पक्षाच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाला असून, यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. राजस्थानमधील माजी मंत्री आणि मुख्य प्रतोद कालू लाल गुर्जर असे या भाजप नेत्याचे नाव आहे.

भाजपच्या माजी मंत्र्याने ग्रुपवर पाठवला अश्लील व्हिडिओ...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जयपूर (राजस्थान): भारतीय जनता पक्षाच्या एका माजी मंत्र्याच्या मोबाईलवरून पक्षाच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाला असून, यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. राजस्थानमधील माजी मंत्री आणि मुख्य प्रतोद कालू लाल गुर्जर असे या भाजप नेत्याचे नाव आहे. मात्र, त्यांनी राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.

मास्टर ब्लास्टरच्या 'डुप्लिकेट'ला झाला कोरोना अन्...

राजस्थानमध्ये भाजपचा एक व्हॉट्सऍप ग्रुप आहे. या ग्रुपचे कालू लाल गुर्जर हे सदस्य आहेत. गुर्जर यांच्या मोबाईलवरून भाजपच्या ग्रुपबरोबरच अनेकांच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ अपलोड झाला. अश्लिल व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला. शिवाय, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. राज्यात अश्लील व्हिडिओची चर्चा सुरू झाली. यानंतर भाजपच्या माजी पदाधिकाऱयाने गुर्जर यांच्याविरूद्ध मांडल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष कमलेश गुढ्ढा म्हणाले, 'माजी मंत्री कालू लाल गुर्जर आमच्या' हम साथ साथ हैं 'या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपशी जोडलेले आहेत. त्यांनी या ग्रुपमध्ये काही अश्लील व्हिडिओ पोस्ट केले. यामुळे आज मी त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पाकमध्ये शीख युवतीचे अपहरण करुन धर्मांतर अन्...

गुर्जर म्हणाले, 'एका व्यक्तीने मला फोन करून तुमच्या नंबरवरून अश्लील व्हिडिओ ग्रुपवर अपलोड झाल्याचे सांगितले. तत्काळ मी माझ्या मोबाईल पाहिला तर मला पण आढळून आले. पण, मला भेटायला अनेकजण येत असतात. कदाचित त्यांच्यातील कोणीतरी हा व्हिडिओ माझ्या मोबाइलवरून ग्रुपवर पाठवला आहे. माझी राजकीय प्रतिमा खराब करण्याचा उद्देश आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या लोकांनी मला पराभूत केले होते, तेच लोक या षडयंत्रात सामील झाले असतील. कारण आगामी विधानसभा निवडणुकीत स्वच्छ प्रतिमेमुळे मला तिकीट मिळेल याची त्यांना भीती वाटत आहे.'

युवती टॉपलेस अवस्थेत चालत निघाली अन्...