मास्टर ब्लास्टरच्या 'डुप्लिकेट'ला झाला कोरोना अन्...

sachin tendulkar look alike balvir chand
sachin tendulkar look alike balvir chand
Updated on

चंदीगड (पंजाब): मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा डुप्लिकेट म्हणून बलवीर चंद प्रसिद्ध आहेत. पण, सध्या ते आर्थिक अडचणीत आले असून, कोरोनाचीही लागण झाली आहे.

बलवीर चंद यांची (वय 50) हे मुळचे पंजांब येथल सहलोन गावचे रहिवासी आहेत. पण, कामानिमित्त त्यांचे मुंबईमध्ये वास्तव्य आहे. सचिन तेंडुलकरचा डुप्लिकेट म्हणून त्यांची मोठी ओळख आहे. त्यांनी विविध जाहिरातींमध्ये काम केले असून, एक कंपनीचा ब्रॅण्ड ऍम्बॅसिडर आहेत. पण, कोरोना व्हायसमुळे कंपनी बंद होती. कंपनीने कर्मचाऱयांची कपात करण्यास सुरवात केली. बलवीर यांचे काम गेल्यामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले.

आर्थिक उत्पन्न थांबल्यामुळे बलवरी यांनी गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. गावाला गेल्यानंतर प्रथम त्यांना कोरोनाची चाचणी करावी लागली. अहवाल हाती आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यामुळे ते दुहेरी संकटात सापडले आहेत.

बलवीर म्हणाले, 'कोरोनाच्या संकटात अनेकांनी जन्मगावी जाण्यास प्राधान्य दिले. मी सुद्धा पत्नी आणि मुलांना घेऊन गावी आलो. कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्व काळजी घेऊन प्रवास केला. पण, कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यामुळे सध्याच्या घडीला प्रवास करणे सुरक्षित नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com