
Former Supreme Court Judges Say Governors Ignoring Elected Government Should Face Removal Mechanism
Esakal
न्यायालयाचा ज्यांच्याविरोधात एखादा निर्णय आला असेल अशा लोकांना राज्यपाल बनवू नये असं मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रोहिंटन फली नरीमन यांनी म्हटलंय. राज्यपालांची नियुक्ती करण्यासाठी आणि त्यांना हटवण्यासाठी एक घटनात्मक व्यवस्था करायला हवी. निवडून आलेल्या सरकारच्या कामात अनावश्यक हस्तक्षेप करणाऱ्या राज्यापालांवर कारवाई केली पाहिजे असंही नरीमन यांनी म्हटलंय.