ट्विटर इंडियाच्या माजी प्रमुखांनी सोडली नोकरी; आता करणार 'हे' काम

Manish Maheshwari
Manish Maheshwariesakal
Summary

पराग अग्रवाल यांची ट्विटरचे नवीन सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

ट्विटर इंडियाचे माजी प्रमुख मनीष माहेश्वरी (Manish Maheshwari) यांनी स्वतः कंपनी सोडलीय. मनीष आता शिक्षण क्षेत्रात करिअर करणार असल्याचं कळतंय. यावर्षी राहुल गांधींचं (Rahul Gandhi) ट्विटर अकाउंट बंद केल्यानंतर, सुरू झालेल्या गदारोळानंतर मनीष माहेश्वरीला ऑगस्टमध्ये अमेरिकेला परत पाठवण्यात आलं होतं. आता मनीषनं स्वतः ट्विट करून ट्विटर सोडत असल्याची माहिती दिलीय.

मनीषनं ट्विटमध्ये लिहिलंय, जवळपास तीन वर्षांनंतर मी शिक्षण आणि अध्यापनासाठी स्वतःला समर्पित करण्यासाठी ट्विटर सोडत आहे. मी ट्विटर सोडलं असलं तरी, शिक्षणाद्वारे जागतिक स्तरावर काय परिणाम होऊ शकतो, यासाठी मी उत्सुक आहे. मनीष यांनी एप्रिल 2019 मध्ये भारतातील कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला होता. मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या तनय प्रतापसोबत हा संयुक्त उपक्रम सुरू करणार असल्याचं माहेश्वरी यांनी सांगितलंय.

Manish Maheshwari
मोठी बातमी! भाजप खासदार उदयनराजेंनी घेतली शरद पवारांची भेट

कोरोनामुळं अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडून गेलीय. शिक्षण व्यवस्थेतही मोठा बदल पहायला मिळतोय, त्यामुळंच शिक्षण क्षेत्रात करिअर करणं मला महत्वाचं वाटतं, असं माहेश्वरी म्हणाला. सध्या, पराग अग्रवाल (Parag Agarwal) यांची ट्विटरचे नवीन सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. माहेश्वरी आपली सॉन फ्रान्सिस्कोची भूमिका सोडून स्वतःचं एडटेक स्टार्टअप सुरू करणार असल्याचं कळतंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com