भाजप-शिवसेनेला गडकरीचं एकत्र आणू शकतात; अब्दुल्ल सत्तार यांना विश्वास

सत्तार यांच्या या विधानानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Nitin Gadkari
Nitin Gadkarisakal

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) ज्यादिवशी भाजप-शिवसेनाची मने जुळविण्याचा निर्णय घेतील, त्यादिवशी खरोखर मने जुळतील, असे विधान शिवसेना नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिल्लीत माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केले आहे. याशिवाय भविष्यात महाराष्ट्रात कुठलेही परिवर्तन करायचे असेल तर, त्याची चावी म्हणजे नितीन गडकरी आहे, असे देखील सत्तार यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Shivsena Leader Comment On SenaBJp Alliance )

Nitin Gadkari
ओमिक्रॉनचं संकट: पुण्यात लॉकडाऊन? अजित पवारांनी दिलं उत्तर

दरम्यान, सत्तार म्हणाले की, मी शिवसेनेचा एक साधा कार्यकर्ता आहे. मात्र, जर भविष्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Maharashtra CM Uddhav Thackeray) आणखी पुढील अडीच वर्षे देण्याचा प्रस्ताव ठेवल्यास युतीबाबत निश्चित विचार होऊ शकतो. शिवसेनेचे वरिष्ठ नेते ज्यादिवशी निर्णय घेतील आणि नितीन गडकरी, अमित शाह (Nitin Gadkari & Amit Shah) यांनी पुढाकार घेतल्यास काहीही होऊ शकते. असे सत्तार म्हणाले. रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) मुख्यमंत्रीपद चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात. त्यांच्याकडे राज्याचे प्रमुखपद दिले तर कोणाचीही हरकत नसेल, असे देखील सत्तार यांनी म्हटले आहे.

Nitin Gadkari
पुणेकरांनो काळजी घ्या, दिवसभरात 1,104 रुग्णांची नोंद

विधिमंडळ अधिवेशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीवरून जोरदार टीका केली होती. तसेच मुख्यमंत्री उपस्थित नसल्यास कुणाला तरी पदभार देण्याची परंपरा असून, त्यासाठी एक प्रक्रिया असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. तसेच रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com