गौतम गंभीरने जपली 'अशी' माणूसकी...

वृत्तसंस्था
Friday, 24 April 2020

भारताचा माजी सलामीवीर आणि भारतीय जनता पक्षाचा खासदार गौतम गंभीरने माणूसकीचे दर्शन घडवले असून, नेटिझन्सनी सोशल मीडियावर कौतुक केले आहे.

नवी दिल्ली: भारताचा माजी सलामीवीर आणि भारतीय जनता पक्षाचा खासदार गौतम गंभीरने माणूसकीचे दर्शन घडवले असून, नेटिझन्सनी सोशल मीडियावर कौतुक केले आहे.

गुड न्यूज : देशातील 'ही' तीन राज्ये कोरोनामुक्त...

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनदरम्यान त्यांनी कामगारांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. गंभरच्या घरी ओडिशाच्या सरस्वती पात्रा या घरकाम करत होत्या. त्यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होत होता. काही दिवसांपूर्वी त्यांना दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे 21 एप्रिल रोजी निधन झाले. गंभीरने स्वतः त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. गंभीरने सामाजिक बांधिलकी समून माणूसकीचे दर्शन घडवले आहे.

कोरोनामुळे डॉक्टर दाम्पत्य झाले भावूक अन् लिहीले मृत्यूपत्र...

गंभीरने ट्विटरवर म्हटले आहे की, 'ती आमच्या कुटुंबाची सदस्य होती आणि अंत्यसंस्कार करणे ही माझी जबाबदारी होती. जात, धर्म, धर्म किंवा सामाजिक प्रतिष्ठेचा विचार मी करत नाही. चांगला समाज निर्माण करण्याचा हाच मार्ग आहे.. ओम शांती.'

दरम्यान, कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी गंभीरने नवी दिल्ली सरकारला 50 लाख रुपयांची मदत केली आहे. शिवाय, दोन वर्षांचा पगार त्याने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिला आहे.

...आणि तहसीलदारांच्या डोळ्यात टचकण पाणी आलं


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gautam gambhir performs last rites domestic help