Same Sex Marraige : 'पुन्हा येऊ पुन्हा लढू', सुप्रीम कोर्टाच्या बाहेर साखरपुडा! फोटोनं वेधलं लक्ष

बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी देखील न्यायालयाच्या आदेशावर दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत आल्या आहेत.
Same Sex Marriage We'll Return To Fight Another Day
Same Sex Marriage We'll Return To Fight Another Dayesakal
Updated on

We'll Return To Fight Another Day : समलैंगिकांना विवाहास कायदेशीर मान्यता मिळणार की नाही यावरुन सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र न्यायालयाच्या निर्णयानं एलजीबीटीक्यू बांधवांना निराश केल्याचे दिसून आले. त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटले. कित्येकांनी न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी देखील न्यायालयाच्या आदेशावर दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत आल्या आहेत. यात अभिनेत्री भूमि पेडणेकर, रिचा चढ्ढा, दिग्दर्शक निर्माता ओनीर, सेलिना जेटली या सेलिब्रेटींचा समावेश आहे. या सगळ्यात एका समलैंगिक जोडप्यानं सर्वोच्च न्यायालयातच साखरपुडा केल्याचे बातमी समोर आली आहे.

Also Read - Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. एलजीबीटीक्यू च्या काही सदस्यांनी आम्हाला स्पेशल मॅरेज अॅक्टमधून लग्नाची परवानगी मिळावी. अशी मागणी आपल्या याचिकेद्वारे कोर्टाकडे केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून कायदेशीर मार्गानं हा लढा सुरु आहे. जगाच्या पाठीवरील कित्येक देशांमध्ये अशा प्रकारच्या विवाहाला मान्यता मिळाल्याचे दिसून आले आहे.

भारतामध्ये मात्र अद्याप समलैंगिक व्यक्तींच्या विवाहाला मान्यता मिळालेली नाही. सध्या त्या समलैंगिक जोडप्याच्या साखरपुड्याची गोष्ट समोर आली आहे. त्यात त्यांनी न्यायालयातच साखरपुडा उरकला आहे. आणि तो फोटो शेयर करताना म्हटले आहे की, आम्ही हटणार नाही, न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. लढा असाच सुरु ठेवणार. त्या बातमीनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Same Sex Marriage We'll Return To Fight Another Day
Same Sex Marriage : 'प्रेम म्हणजे प्रेम असतं, पण...' सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बॉलीवूडमधील सेलिब्रेटीचं काय आहे म्हणणं?

लेखक अनन्या कोटिया आणि वकील उत्कर्ष सक्सेना यांचा साखरपुडा कोर्टात पार पडला असून त्या फोटोंवर आलेल्या प्रतिक्रिया देखील भन्नाट आहेत. काल पाच न्यायधीशांच्या खंडपीठानं समलैंगिक व्यक्तीच्या विवाहावरील याचिकेवर दिलेला निर्णय वेगवेगळ्या पैलुंनी समोर आला आहे. कोर्टानं यात आपण कोणत्याही प्रकारे कायदा तयार करण्यास सक्षम नसून तो अधिकार आपल्याला नसल्याचे म्हटले आहे.

यावेळी कोर्टानं समलैंगिक व्यक्तींना मुलांना दत्तक घेण्यावर आणि त्यांच्या संगोपनाच्या अधिकारावर देखील भाष्य केले आहे. या व्यक्तींसोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ नये, तसेच त्यांना शासनाच्या सर्व सुविधांचा लाभ मिळावा याबाबतच्या सुचना केंद्रसरकारला केल्या आहेत.

Same Sex Marriage We'll Return To Fight Another Day
Same Sex Marriage : समजा सर्वोच्च न्यायालयानं समलिंगी विवाहाला मान्यता दिली असती तर काय झाले असते?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com