लस घ्या, पण कोणी लस घ्यावी व कोणी घेऊ नये याबद्दल सूचना वाचा

वृत्तसंस्था
Wednesday, 20 January 2021

कोरोनाला अटकाव घालण्यासाठी देशभरात लसीकरण सुरू झाले आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ऑक्सफर्ड कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची स्वदेशी कोव्हॅक्सिन लस दिल्यानंतर गेल्या तीन दिवसांत ५०० हून अधिक लोकांना दुष्परिणाम जाणवले आहेत. यामुळे या दोन्ही कंपन्यांनी लसीकरणाबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल जाहीर केला आहेत.

नवी दिल्ली - कोरोनाला अटकाव घालण्यासाठी देशभरात लसीकरण सुरू झाले आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ऑक्सफर्ड कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची स्वदेशी कोव्हॅक्सिन लस दिल्यानंतर गेल्या तीन दिवसांत ५०० हून अधिक लोकांना दुष्परिणाम जाणवले आहेत. यामुळे या दोन्ही कंपन्यांनी लसीकरणाबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल जाहीर केला आहेत. त्यानुसार कोणी लस घ्यावी व कोणी घेऊ नये याबद्दल सूचना केल्या असून संकेतस्थळांवर त्याची माहिती दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सीरमची कोव्हिशिल्ड
यांनी लस घेऊ नये...

 • जर एखादे औषध किंवा गोळ्यांची, अन्नपदार्थ किंवा अन्य कोणतीही ॲलर्जी असणे.
 • ताप किंवा सर्दीने आजारी.
 • थॅलेसिमिया आणि रक्तासंबंधी विकाराचे रुग्ण
 • गर्भवती किंवा मूल होऊ देण्याचे नियोजन करणाऱ्या महिला व स्तन्यदा माता.
 • कोरोनाप्रतिबंधक अन्य कोणती लस घेतली असल्यास कोव्हिशिल्ड घेऊ नये. 
 • पहिला डोस घेतल्यानंतर ॲलर्जी आल्यास लस घेऊ नये.

आता खासदारांना 50 रुपयांत 'चिकन करी' मिळणार नाही, संसदेतील कँटिनची सबसिडी संपुष्टात

अन्य सूचना

 • लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर चार ते सहा आठवड्यांत दुसरा डोस घेणे आवश्‍यक.
 • कमी रोगप्रतिकारक क्षमता असणाऱ्यांना लशीचे सौम्य दुष्परिणाम जाणवतात.
 • असे झाल्यास लस टोचणाऱ्यांना त्वरित कळवावे.

संभाव्य दुष्परिणाम

 • लस घेणाऱ्या दहापैकी एकाला दुष्परिणाम जाणवू शकतात.
 • इंजेक्शन घेतलेल्या जागी दाब दिल्यास वेदना होणे, लाल वण उठणे, खाज किंवा सूज येऊ शकते.
 • बरे न वाटणे, थकवा, ताप येणे, डोकेदुखी, सांधेदुखी.

जमीन महाराष्ट्राचीच; कर्नाटक सीमावादात काँग्रेसची उडी

दुष्परिणाम झाल्यास हे करा...

 • जर गंभीर ॲलर्जी आल्यास नजीकच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा.
 • आरोग्यसेवकांच्या निदर्शनास आणून देणे.
 • सीरमलाही माहिती देऊ शकतात. टोल फ्री नंबर ः १८००१२००१२४
 • pharmacovigilance@seruminstitute.com या इमेलवर शंका, प्रश्‍न विचारू शकतात.

हे वाचा - अरुणाचलमध्ये चीनने गावच नाही, तर मिलिट्री कॅम्पही वसवलेत; भाजप खासदाराची कबुली

भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन
यांनी लस घेऊ नये...

 • आधीपासून ॲलर्जी, ताप, अथवा रक्तस्त्रावाबद्दलच्या तक्रारी असल्यास
 • प्रतिकारशक्ती कमी असणे.
 • प्रतिसुरक्षा प्रणालीवर परिणाम होऊ शकणाऱ्या औषधांचे सेवन करणे.
 • गर्भवती किंवा स्तन्यदा माता.
 • ज्यांनी कोरोनाची अन्य लस घेतली असेल किंवा गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्ती.

हेही वाचा- कोण जेपी नड्डा? मी कशाला उत्तर देऊ? - राहुल गांधी

दावे व सूचना

 • कोव्हॅक्सिनमुळे श्‍वास घेण्यास अडथळा येणे, चेहरा, घसा सुजणे, हृदयाचे ठोके वाढणे, थकवा आणि ॲलर्जी अशा गंभीर समस्या जाणवण्याची शक्यता कमी.
 • लशीचा डोस घेतल्यानंतरही कोरोनाच्या बचावासाठी सर्व नियम पाळणे गरजेचे.
 • औषधाचे सेवन नियमितपणे करीत असल्यास किंवा एखादा गंभीर आजार असल्यास त्याची माहिती लसीकरण अधिकाऱ्यांनी द्यावी.
 • लसीकरणाच्या दुसरा डोस घेतल्यानंतर संबिधितांचे निरीक्षण तीन महिन्यांपर्यंत करावे.
 • कोव्हॅक्सिनची लस घेतल्यानंतर आरोग्यविषयक समस्या आढळल्यास अथवा प्रतिकूल परिणाम दिसल्यास सरकारी रुग्णालयात देखरेखीखाली ठेवावे. 
 • गंभीर दुष्परिणाम आढळल्यास भरपाई देणार.

कोव्हॅक्सिनचे आणखी डोस
हैदराबाद - कोव्हॅक्सिन लशीचे आणखी ४५ लाख डोसचे वितरण करण्यास भारत बायोटेकला केंद्राने मंगळवारी परवानगी दिली. या डोसांपैकी आठ लाख डोस मॉरिशस, फिलिपिन्स आणि म्यानमार या मित्र देशांना शेजारधर्माच्या नात्याने मोफत देण्यात येणार आहेत. आधीच्या टप्प्यांतील २० लाख डोसचे वितरणही येत्या दोन दिवसांत होणार असल्याचे सांगण्यात आले. मंत्रालयाकडून मागणी नोंदविल्यानंतर नवीन डोस पाठविले जाणार आहेत. सामान्य निविदेनुसार साहित्य पोचविण्यास निश्‍चित कालावधी दिलेला असतो, पण एकाच वेळी सर्व डोस पाठविता येऊ शकत नाही. 

बांगलादेशला ‘कोव्हिशिल्ड’ची भेट
ढाका - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारताकडून ॲस्ट्राझेनेका (कोव्हिशिल्ड) लशीचे २० लाख डोस बांगलादेशला भेट स्वरूपात मिळणार आहे. हे डोस बुधवारी (ता. २०) देशात पोचतील, अशी माहिती बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या फेसबुक पेजवर आज जाहीर केले. भारतातून कोव्हिशिल्डची लस घेऊन येणारे विमान उद्या ढाकातील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोचेल. सत्ताधारी अवामी लीग पक्षानेही भारताकडून २० लाख डोस मिळणार असल्याचे ट्विट केले आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Get vaccinated but read instructions get vaccinated