

गाजियाबादच्या मोदीनगर परिसरात एका तरुण मुलीला गॅस सिलेंडर देण्याच्या निमित्ताने शेतात नेऊन तिच्यावर दोघांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी तिचा अश्लील व्हिडिओ तयार करून दोन दिवस तिला धमकावले. या प्रकरणी भोजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.