Vidhan Sabha 2019 : गोव्यातील भाजप नेते महाराष्ट्रात; कोण-कोण करतंय प्रचार?

प्रशांत शेट्ये
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

तेंडुलकर, धोंड, तानावडे, मिलींद नाईक, दामू नाईक यांचा प्रचारात सहभाग

मडगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारात मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्यासह गोव्यातील अनेक भाजप नेते व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. 19 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील प्रचार संपणार असून तोपर्यंत भाजपचे गोव्यातील नेते व कार्यकर्ते तिथेच डेरा टाकतील. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, गोवा व ठाण्याचे संघटनमंत्री सतीश धोंड, राज्य सरचिटणीस सदानंद तानावडे व दामू नाईक, नगरविकासमंत्री मिलींद नाईक, आमदार दयानंद सोपटे, माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, दवर्लीचे जिल्हा पंचायत सदस्य उल्हास तुयेकर हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात प्रचारात सहभागी झाले आहेत. 

मंत्रीच म्हणतात मोदींच्या सभेसाठी दुचाकीवर पाच-पाचजण बसा (व्हिडिओ)

मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर व इतर भागात दौरा सुरु आहे. तेंडुलकर हे रायगड जिल्ह्यात, तानावडे सिंधुदुर्ग, मिलींद नाईक पनवेल व दामू नाईक हे चंदगड येथे भाजप उमेदवाराचा प्रचार करत आहे. धोंड हे ठाण्यासह कोकणात नजर ठेवून आहेत. 

फोर्ब्सची यादी जाहीर; श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी अव्वल

`गोव्यातील भाजप नेत्यांच्या महाराष्ट्रातील निवडणुकीतील ही प्रचारमोहीमेचे धोंड हे प्रमुख असून या मोहिमेचे समन्वयन ते करत आहेत. मतदारसंघांची जबाबदारी नेत्यांवर वाटून दिलेली आहे. माझ्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी आहे. येत्या काही दिवसांत राज्य सरचिटणीस व माजी खासदार एड. नरेंद्र सावईकर सिंधुदर्गात प्रचारकार्यात सहभागी होतील, असे तानावडे यांनी सांगितले. 

वडिलांचा राजकीय वारसा चालवणाऱ्या संघर्षकन्या

दामू नाईक यांच्या सोबत संजय सातार्डेकर, शशी परब आदी नेते - कार्यकर्ते चंदगडमध्ये प्रचार करत आहेत. आणखी बरेचसे नेते व कार्यकर्ते महाराष्ट्रात गेले आहेत. 19 ऑक्टोबरपर्यंत हे नेते व कार्यकर्ते महाराष्ट्रात असतील. 19 ऑक्टोबरनंतर कार्यकर्ते गोव्यात परत येतील. पण, ज्येष्ठ नेते मात्र तिथे थांबतील असे तानावडे यांनी सांगितले. 

कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात भाजप - शिवसेना महायुतीचेच वारे आहे. निवडणुकीच्या रणांगणात विरोधकांचे अस्तित्वच जाणवत नाही. भाजपचे उमेदवार या निवडणुकीत मोठ्या संख्यने निवडून येतील असा विश्वास तानावडे यांनी व्यक्त केला. 

नावेलीचे कार्यकर्ते पेणमध्ये
भाजपच्या नावेली मंडळाचे कार्यकर्ते प्रचारासाठी पेण येथे गेले आहेत. भाजपचे पेणचे उमेदवार रवींद्र पाटील यांचा प्रचार ते करत आहेत. दवर्लीचे जिल्हा पंचायत सदस्य उल्हास तुयेकर, दवर्ली दिकरपालचे पंच परेश नाईक, नावेली मंडळाचे पदाधिकारी दीपक सावंत, अशोक वेर्णेकर व नरेश गोवेकर हे गेले तीन दिवस पेण मतदारसंघात वावरत आहेत. आज संध्याकाळी पाटील यांची जाहीर सभा झाली. या सभेत ते उपस्थित होते. वास्को येथील नगरसेवक व कार्यकर्तेही पेण येथे आहेत, असे तुयेकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Goa BJP leaders campaign For Vidhan Sabha Election in Maharashtra