वय वंदन योजनेला मुदतवाढ;केंद्र सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा 

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 मे 2020

पंतप्रधान वय वंदना योजनेला केंद्र सरकारने तीन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. या योजनेचा कालावधी आता ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविण्यात आला आहे. याआधी ही योजना ३१ मार्च २०२० पर्यंतच सुरू होती.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांना निवृत्ती वेतन देणाऱ्या पंतप्रधान वय वंदना योजनेला (पीएमव्हीव्हीवाय) केंद्र सरकारने तीन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. या योजनेचा कालावधी आता ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविण्यात आला आहे. याआधी ही योजना ३१ मार्च २०२० पर्यंतच सुरू होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी नवी दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत वय वंदन योजनेला तीन वर्षांची मुदतवाढीचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. 

काय आहे योजना?  
ज्येष्ठ नागरिक म्हणजेच ६० वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी केंद्र सरकारची ही पेंशन योजना असून योजनेचा लाभ एकत्र रक्कम भरल्यानंतर घेतला जाऊ शकतो. यापूर्वी या योजनेत गुंतवणुकीसाठी ३१ मार्च २०२० ही अंतिम मुदत होती. 

Lockdown : भारतात प्रत्येक राज्यात घराबाहेर पडण्याचे प्रमाण वाढले

दरमहा पेंशनचा पर्याय 
ज्येष्ठ नागरिकांना दरमहा पेंशनचा पर्याय निवडल्यानंतर दहा वर्षांसाठी कमीत कमी आठ टक्क्याचा परतावा मिळतो. वार्षिक पेंशनचा पर्याय निवडल्यास ज्येष्ठ नागरिकाला १० वर्षांसाठी कमीत कमी ८.३ टक्क्यांचा परतावा मिळेल. महत्त्वाचे म्हणजे योजनेला वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) वगळण्यात आले आहे. 

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) माध्यमातून योजनेची अमलबजावणी केली जाते. शिवाय प्रमुख बँकांमध्ये ही योजना उपलब्ध आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

किती गुंतवणूक करता येते? 
योजनेत जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते. १५ लाखांवर दर महिन्याला १० हजार रुपये पेंशन मिळू शकते. प्राप्तिकर अधिनियम १९६१ च्या कलम ८०-सीअंतर्गत ही रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे. महत्त्वाचे म्हणजे पती-पत्नी मिळून एकूण ३० लाख रुपये गुंतवणूक करू शकतात. 

प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अर्थ मंत्र्यांना परताव्याचे दर निश्चित करण्यासाठी अधिकार देण्यात येतील. 

मुख्यमंत्री ठाकरेंवर भाजप अशाप्रकारे साधणार निशाणा...

योजनेंतर्गत किमान गुंतवणुकीत सुधारणा करण्यात आली असून दरवर्षी १२,००० रुपये निवृत्ती वेतन मिळण्यासाठी १,५६,६५८ रुपये आणि दरमहा १००० रुपये निवृत्ती वेतन मिळण्यासाठी १,६२,१६२ रुपये इतकी गुंतवणूक करावी लागेल. 

पेंशन कधी मिळणार? 
पॉलिसीचा कालावधी १० वर्ष असून पेंशन दर महिन्याला, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक घेण्याचा पर्याय आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government 3year extension to PMVVY which provides pension to senior citizens