Booster Dose सम की विषम लशींचा? दोन आठवड्यात ठरणार धोरण

Booster Dose Policiy
Booster Dose Policiysakal

नवी दिल्ली : एकच लस (सम) की दोन वेगवेगळ्या लशींचा (विषम) बूस्टर डोस (Booster Dose Policy) द्यायचा याबाबतच धोरण येत्या दोन आठवड्यात ठरणार आहे. केंद्र सरकार याबाबत निर्णय घेणार आहे. यासाठी वेल्लोर ख्रिश्चन मेडीकल कॉलेजकडून ट्रायल करून डेटा तयार केला जात आहे.

Booster Dose Policiy
प्रवासासाठी बूस्टर डोस आवश्यक, केंद्रानं धोरण ठरवावं : पूनावाला

गेल्या वर्षी राष्ट्रीय औषध नियामकाने वेल्लोर येथील मेडीकल कॉलेजला सम आणि विषम लशींच्या बूस्टर डोसच्या चाचण्या घेण्यास परवानगी दिली होती. हा डेटा तयार होत असून लवकरच केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञांसमोर सादर केला जाणार आहे. आम्हाला आरोग्य मंत्रालयाच्या स्क्रिनिंग कमिटीकडून नमुने तपासण्यासाठी परवानगी मिळाली. संपूर्ण डेटा तयार करण्यासाठी जवळपास दोन आठवडे लागतील, असं वेल्लोर मेडीकल कॉलेजचे वरिष्ठ लस तज्ज्ञ गगनदीप कांग म्हणाले. नमुन्याची चाचणी सुरू झाली आहे आणि एका आठवड्यात आम्ही संबंधित डेटा सादर करू. यासाठी औषध नियामकांकडून आधीच वेळ मागितली आहे, असंही कांग यांनी सांगितलं. याबाबत हिंदूस्थान टाइम्सने वृत्त दिलं आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये, राष्ट्रीय औषध नियामकाने CMC वेल्लोरला अभ्यास करण्याची परवानगी दिली. त्यानंतर मार्चमध्ये प्राथमिक निष्कर्ष विश्लेषणासाठी लसीकरण राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटासोबत (NTAGI) शेअर केले. NTAGI ने आपल्या शेवटच्या बैठकीत अँन्टीबॉडीजची संख्या अधिक कशी तयार होईल याचा डेटा मागितला आहे. पण, त्यासाठी अधिक निधीची गरज असून या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय आऱोग्य मंत्रालयाला पत्र लिहिण्यात येणार आहे, अशी माहिती मिळतेय.

चाचण्या करताना कोविशिल्डचा प्राथमिक डोस दिला जात आहे. त्यानंतर कोवॅक्सिनचा बूस्टर डोस दिला जातोय. ज्यांनी कोवॅक्सिन लस घेतली असेल तर त्यांना बूस्टर डोस म्हणून कोविशिल्ड देण्यात येत आहे. यामधून डेटा तयार झाल्यानंतर तो NTAGI समोर सादर केला जाईल. अद्याप डेटा समोर आला नाही. तरीही विषम लशींचा बूस्टर डोस घेतल्यास तो अधिक परिणामकारक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com