भारताचा चीनला मोठा दणका, ५९ चिनी मोबाईल ऍप्लिकेशन्सवर भारतात बंदी...

भारताचा चीनला मोठा दणका, ५९ चिनी मोबाईल ऍप्लिकेशन्सवर भारतात बंदी...

नवी दिल्ली - चीनला धडा शिकवण्यासाठी केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील वाढत्या टेन्शनच्या पार्श्वभूमीवर भारताने अत्यंत मोठं आणि महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. गलवान खोऱ्यात चीनकडून अजूनही आगळीक सुरु आहे.चीन आपलं सैन्य मागे घेण्यास तयार नाही. या पार्श्वभूमीवर आता भारताने कठोर पावलं उचलायला सुरवात केलीये. सगळ्या बाजूने आता भारतातर्फे चीनची नाकाबंदी केली जातेय. यातील एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे भारतातर्फे आता ५९ चिनी मोबाईल ऍप्लिकेशन्सवर बंदी घालण्यात आली आहे. 

भारताने चीनच्या तब्बल ५९ मोबाईल ऍप्लिकेशनवर भारतात बंदी घालण्यात आलेली आहे. भारताने बंदी घातलेल्या या ऍप्लिकेशन मधून भारतीयांच्या प्रायव्हसीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून या ऍप्लिकेशन्सवर भारताने बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये भारतात प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या टिक टॉकचाही समावेश आहे. आज दिल्लीत माहिती आणि तंत्रज्ञान मिनिस्ट्रीची  (Ministry of Information Technology) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कलम 69A अंतर्गत एकूण ५९ चिनी ऍप्लिकेशन्सवर भारतातर्फे बंदी घातलेली आहे. केंद्र सरकारकडून याबाबत  याबाबत  प्रेस रिलीज जारी करण्यात आलंय 

खालील चिनी ऍप्लिकेशनवर आता बंदी 

  1. TikTok
  2. Shareit
  3. Kwai
  4. UC Browser
  5. Baidu map
  6. Shein
  7. Clash of Kings
  8. DU battery saver
  9. Helo
  10. Likee
  11. YouCam makeup
  12. Mi Community
  13. CM Browers
  14. Virus Cleaner
  15. APUS Browser
  16. ROMWE
  17. Club Factory
  18. Newsdog
  19. Beutry Plus
  20. WeChat
  21. UC News
  22. QQ Mail
  23. Weibo
  24. Xender
  25. QQ Music
  26. QQ Newsfeed
  27. Bigo Live
  28. SelfieCity
  29. Mail Master
  30. Parallel Space
  31. Mi Video Call Xiaomi
  32. WeSync
  33. ES File Explorer
  34. Viva Video QU Video Inc
  35. Meitu
  36. Vigo Video
  37. New Video Status
  38. DU Recorder
  39. Vault- Hide
  40. Cache Cleaner DU App studio
  41. DU Cleaner
  42. DU Browser
  43. Hago Play With New Friends
  44. Cam Scanner
  45. Clean Master Cheetah Mobile
  46. Wonder Camera
  47. Photo Wonder
  48. QQ Player
  49. We Meet
  50. Sweet Selfie
  51. Baidu Translate
  52. Vmate
  53. QQ International
  54. QQ Security Center
  55. QQ Launcher
  56. U Video
  57. V fly Status Video
  58. Mobile Legends
  59. DU Privacy

Government of India has decided to ban 59 Chinese apps diverting data and those with privacy issues

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com