ग्रेटा थनबर्गच्या 'टूलकिट'मागे खलिस्तानी कनेक्शन? काय लिहिलं होतं त्यात?

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 5 February 2021

दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गकडून ट्विट करण्यात आलेल्या डॉक्युमेंटचा तपास सुरु केला आहे.

नवी दिल्ली- दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गकडून ट्विट करण्यात आलेल्या डॉक्युमेंटचा तपास सुरु केला आहे. गुरुवारी यासंबंधी अज्ञातांविरोधात हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे टूलकिट बनवल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. टूलकिट बनवणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा पोलिस प्रयत्न करत आहे. ग्रेटा थनबर्गकडून डिलिट करण्यात आलेल्या ट्विटमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत अराजकता पसरवण्यासाठी विस्तृत्व योजना होती, असा दावा करण्यात आला आहे. 

"बाहेरच्या सेलिब्रिटींनी ट्विट केल्यावर जाग आली का?", अजित पवारांचा...

विशेष पोलिस आयुक्त प्रवीर रंजन यांनी सांगितलं की, सुरुवातीच्या तपासामध्ये टूलकिट एका प्रो-खलिस्तानी संस्थेने बनवलं असल्याचं कळतंय. टूलकिटचा हेतू विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक समुहांमध्ये द्वेष पसरवण्याचा आणि भारत सरकारविरोधात वातावरण निर्मिती करण्याचा होता. पोलिसांनी राजद्रोह, गुन्हेगारी षडयंत्र, समुहामध्ये द्वेष पसरवणे या कलमांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. 

पोलिसांनी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये ग्रेटा थनबर्ग किंवा अन्यांना आरोपी करण्यात आलेले नाही. तपासात कळेल की कोण आरोपी आहे, असं पोलिस म्हणाले आहेत. डॉक्युमेंटचा महत्त्वाच्या भाग नष्ट करण्यात आलाय किंवा डिलिट करण्यात आला आहे. पोलिस एफआयआरच्या आधारावर गूगलला एक नोटीस पाठवतील आणि मुळ डॉक्युमेंटची मागणी करतील. 

भारताने कोणत्या देशांना केला लशींचा पुरवठा? किती लशींची मदत केली? जाणून घ्या

गुन्हा शाखेचे विशेष पोलिस आयुक्त प्रवीर रंजन यांनी म्हटलं की, दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिल्ली पोलिसांची बारीक नजर आहे. 300 पेक्षा जास्त ट्विटर हँडलवर लक्ष ठेवले होते. शेतकरी आंदोलनावरून सुरु असलेल्या तपासामध्ये सोशल मीडियासुद्धा आहे. दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया हँडल्सविरोधात गुन्हाही दाखल केला होता. यामध्ये चुकीची माहिती पसरवणाऱ्या अकाउंटचा समावेश आहे. 

टूलकिटमध्ये काय काय होतं?

टूलकिटची हेटलाईन होती, ‘Will you be part of the largest protest in human history?’( तुम्ही इतिहासातील सर्वात मोठ्या आंदोलनाचा भाग बनाल? यामध्ये ‘#AskIndiaWhy’ आणि  ‘Global Farmers Strike — First Wave’ अशा हॅशटॅगचा वापर करण्यात आला होता. टूलकिटच्या माध्यमातून वातावरण खराब करण्याची आणि भारत सरकारची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न होता असा दावा पोलिसांनी केलाय.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: greta thunberg document farmers protest khalistani connection police