
वावर आहे तर पावर आहे! नवरदेव पोहचला चक्क 51 ट्रॅक्टर घेऊन मांडवात
सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ शेअर केले जातात. काही मजेशीर असतात तर काही अचंबित करणारे असाात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (Groom arrived with 51 tractors at his wedding video goes viral)
या व्हिडीओत नवरदेव चक्क एक दोन नव्हे तर 51 ट्रॅक्टर घेऊन लग्नाच्या मांडवात पोहचला. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली.
हेही वाचा: तरुणांसाठी संरक्षण मंत्रालयाची मोठी घोषणा; 'अग्निपथ' योजनेद्वारे मिळणार देशसेवेची संधी
राजस्थान राज्यातील बाडमेर जिल्ह्यातील सेवनियाचा हा नवरदेव 51 ट्रॅक्टरवर आपले वऱ्हाड घेऊन बोरवा गावात जाताना व्हिडीओत दिसत आहे. ‘वावर आहे तर पावर आहे’ हा वाक्यप्रचाराला इथे जुळताना दिसतोय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल होत आहे.
हेही वाचा: जब-जब मोदी डरते हैं... म्हणत काँग्रेस नेत्याचा केंद्रावर हल्लाबोल
या व्हिडीओत नवरदेव स्वत: ट्रॅक्टर चालवत असून त्याच्यामागे 50 ट्रॅक्टर शिस्तीने येत आहे. एखाद्या चित्रपटात शोभेल असे हे दृश्य आहे. त्याच्या या अनोख्या वऱ्हाडने सर्वांचे लक्ष वेधले आहे. नेटकरी या व्हिडीओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.
Web Title: Groom Arrived With 51 Tractors At His Wedding Video Goes Viral
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..