GST Council : मोठी घोषणा! पाच वर्षांपासून रखडलेली GST ची संपूर्ण रक्कम राज्यांना दिली जाणार

आज पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
nirmala sitaraman
nirmala sitaramanSakal

GST Council : वस्तू आणि सेवा कराची म्हणजेच जीएसटी कौन्सिलची 49 वी बैठक आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत राज्यांना 5 वर्षांसाठी देय असलेली संपूर्ण जीएसटी भरपाई रकक्म आजपासून जारी केली जाणार आहे. या अंतर्गत 16982 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

आज पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. ही रक्कम जारी केल्यावर केंद्र पाच वर्षांसाठी निश्चित केलेली संपूर्ण GST भरपाई जारी करेल, जो GST (राज्यांना भरपाई), कायदा 2017 अंतर्गत निश्चित करण्यात आला होता.

nirmala sitaraman
Sakal Maha Conclave : हर्षवर्धन नेहमी माझं डोकं खातो; सहकार महापरिषदेत शहांनी सांगितलं कारण

या वस्तूंवरील जीएसटी दर करण्यात आला कमी

जीएसटी कौन्सिलची बैठकीत थकबाकी जीएसटी देण्यासोबतच पेन्सिल शार्पनरवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात आला आहे.

यासोबतच टिकाऊ कंटेनरवरील टॅग, ट्रॅकिंग उपकरणे किंवा डेटा लॉगरवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून शून्यावर आणण्यात आला आहे. मात्र, यामध्ये काही अटी लागू असणार आहेत.

nirmala sitaraman
Shivsena Row : उद्धव ठाकरेंचं बाळासाहेबांच्या पावलावर पाउलं; ओपनकारमध्ये केलं कार्यकर्त्यांना संबोधित

याशिवाय उसाच्या राबावरील (Sugarcane Raab) जीएसटी दर 18 टक्क्यांवरून पाच किंवा शून्य करण्यात आला आहे. जर ते प्री-पॅकेज केलेले किंवा लेबल केलेले असेल यावर पाच टक्के जीएसटी आकारला जाईल असे सीतारामन यांनी यावेळी स्पष्ट केले. पान मसाला आणि गुटख्याबाबत जीओएमच्या शिफारशी मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com