Exit Poll 2022: MCD-गुजरात-हिमाचलमध्ये कोण जिंकणार? आज एक्झिट पोल

दुसऱ्या टप्प्यात 14 जिल्ह्यांतील 93 जागांसाठी मतदान
Exit Poll 2022, Gujrat Himachal Exit Poll 2022 Result
Exit Poll 2022, Gujrat Himachal Exit Poll 2022 ResultEsakal

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. दुसऱ्या टप्प्यात 14 जिल्ह्यांतील 93 जागांसाठी मतदान होत आहे. मतदान संपल्यानंतर, गुजरात आणि हिमाचल प्रदेशचे एक्झिट पोल संध्याकाळी येतील. एक्झिट पोलमधून चित्र समोर येईल की गुजरात आणि हिमाचलमध्ये कोणाचे सरकार बनू शकते? गुजरात आणि हिमाचलचे निकाल 8 डिसेंबरला लागणार आहेत. (Gujrat Himachal Exit Poll 2022 Result)

तर गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात 61 राजकीय पक्षांचे 833 उमेदवार रिंगणात आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह पटेल यांचे नशीब आज ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबर रोजी 89 जागांवर मतदान झाले होते. त्यामध्ये सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातच्या जागांचा समावेश होता. पहिल्या टप्प्यात 63.31 टक्के मतदान झाले होते. त्याचवेळी हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 70 जागांसाठी 12 नोव्हेंबरला मतदान झाले होते. हिमाचलमध्ये यावेळी 75 टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे.

हेही वाचा: First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

गेल्या वेळी काय होते निकाल?

गुजरात विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी 18 फेब्रुवारी रोजी संपेल, तर हिमाचल विधानसभेचा कार्यकाळ 8 जानेवारी 2023 रोजी संपेल.

2017 च्या निवडणुकीत भाजपने गुजरात विधानसभेच्या 182 पैकी 99 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. निवडणुकीनंतर भाजपने विजय रुपानी यांना मुख्यमंत्री केले. मात्र, सप्टेंबर 2021 मध्ये रुपानी यांच्या जागी भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री करण्यात आले.

2017 मध्ये गुजरातमध्ये 9 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान मतदान झाले होते. 18 डिसेंबरला निकाल लागला होता. गुजरात विधानसभेत बहुमतासाठी 92 जागा आवश्यक आहेत. दुसरीकडे, 2017 मध्ये हिमाचल विधानसभेच्या 68 जागांसाठी 9 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. भाजपने 68 पैकी 44 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. जयराम ठाकूर यांना मुख्यमंत्री केले.

Exit Poll 2022, Gujrat Himachal Exit Poll 2022 Result
Gujarat Elections 2022: गुजरातमध्ये मतदान संपलं; जाणून घ्या अपडेट्स आणि टक्केवारी

हिमाचलमध्ये भाजप-काँग्रेसची लढत, तर गुजरातमध्ये 'आप'ने बसवत आहे आपला जम

हिमाचल प्रदेशातही यावेळी मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच असल्याचे मानले जात आहे. तर दुसरीकडे गुजरातमध्ये यावेळी दिल्लीतील सत्ताधारी पक्ष आप सुद्धा अनेक मोठ्या घोषणा करत रिंगणात आहे. अशा स्थितीत गुजरातमध्ये भाजप, काँग्रेस आणि आप यांच्यातील लढत तिरंगी मानली जात आहे.

Exit Poll 2022, Gujrat Himachal Exit Poll 2022 Result
Gujarat Assembly Election : भाजप व काँग्रेसमध्ये चुरस

भाजपसाठी गुजरात का महत्त्वाचे?

गुजरातमधला भाजपचा विजय दोन अर्थांनी विशेष आहे. पहिले म्हणजे गुजरात हे पंतप्रधान मोदींचा बालेकिल्ला आहे. तर मोदी ऑक्टोबर 2001 ते मे 2014 पर्यंत मुख्यमंत्री राहिले आहेत आणि दुसरे म्हणजे 1995 पासून येथे भाजपची सत्ता आहे.

1995 मध्ये पहिल्यांदा भाजपचे सरकार स्थापन झाले आणि केशुभाई पटेल मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून काँग्रेसला येथे आपला जम बसवता आलेला नाही. त्याचबरोबर, 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने कडवी झुंज दिली आणि 182 पैकी 77 जागा मिळवल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com