

Punjab Protester Climbs Down After Long Agitation
Esakal
पंजाबमध्ये ५६० दिवसांपासून टॉवरवर आंदोलन करणाऱ्या गुरुजीत सिंह खालसा यांना शुक्रवारी खाली उतरवण्यात आलं. गुरु ग्रंथ साहिबचा अपमान केल्या प्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी गुरुजीत सिंह खालसा यांनी केली होती. याविरोधात कायदाही करावा अशी त्यांची मागणी होती. गुरुजीत सिंह खालसा यांनी एक दोन नव्हे तर तब्बल ५६० दिवस ४०० फूट उंच टॉवरवर आंदोलन केलं. त्यांचे हे आंदोलन अखेर थांबवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. Gurjeet Singh Khalsa Ends 560 Day Tower Protest