esakal | Hathras Case:पीडितेचे कुटुंब भीतीच्या छायेत, कोर्टात जाण्यासाठी रात्री प्रवास करण्यास नकार
sakal

बोलून बातमी शोधा

hathras case update victims family to appear lucknow high court

पीडित तरुणीच्या कुटुंबाला जबाब नोंदवण्यासाठी हायकोर्टात जावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना हाथरस येथून लखनौ येथे हायकोईर्टात नेण्यात येणार आहे. अर्थातच पोलिस बंदोबस्तात त्यांना नेण्यात येईल. परंतु, रात्री प्रवास करण्यास पीडितेच्या कुटंबीयांनी नकार दिला आहे.

Hathras Case:पीडितेचे कुटुंब भीतीच्या छायेत, कोर्टात जाण्यासाठी रात्री प्रवास करण्यास नकार

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

हाथरस (उत्तर प्रदेश) : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. पीडित तरुणीचा मृतदेह पोलिसांनी परस्पर जाळल्यानंतर, या प्रकरणाचा भडका देशभर उडाला. संबंधित तरुणीच्या कुटुंबाला सध्या पोलिस संरक्षण देण्यात आलं असलं तरी, तिचे कुटुंब भितीच्या छायेत वावरत आहे. 

आणखी वाचा - मुंबईत आरेचं मेट्रो कारशेड आता कांजूरमार्गला!

रात्रीचा प्रवास नको!
पीडित तरुणीच्या कुटुंबाला जबाब नोंदवण्यासाठी हायकोर्टात जावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना हाथरस येथून लखनौ येथे हायकोईर्टात नेण्यात येणार आहे. अर्थातच पोलिस बंदोबस्तात त्यांना नेण्यात येईल. परंतु, रात्री प्रवास करण्यास पीडितेच्या कुटंबीयांनी नकार दिला आहे. या संदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने एक वृत्त दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सुरुवातीला पोलिस प्रशासन  पीडितेच्या कुटुंबाला दिवसा हायकोर्टात घेऊन जाण्यास तयार झाले होते. त्यानंतर त्यांनी रात्री प्रवास करण्याचा प्रस्ताव दिला आहे. कुटुंबाने रात्री प्रवास करण्यास नकार दिलाय. 

आणखी वाचा - हाथरस प्रकरणात मोठा खुलासा, कुटुंबात महिलेचे संशयास्पद वास्तव्य

पाच जण कोर्टात जाणार
कुटुंबातील पाच सदस्य जबाब नोंदवण्यासाठी हायकोर्टात जाणार आहेत. त्याच बरोबर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनाही कोर्टात हजर रहावे लागणार आहे. या संदर्भात पीडित तरुणीच्या भावाने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, 'आम्ही पाचजण कोर्टात हजर होणार आहोत. 12 ऑक्टोबरच्या सुनावणीत कुटुंबातील कितीजण हजर राहणार आहात, असं जिल्हा प्रशासनानं आम्हाला विचारलं होतं. त्यात मी, माझा लहान भाऊ, बहीण आणि आई-वडील, असे आम्ही पाचजण कोर्टात हजर होऊ. लखनौपर्यंत आणि तेथून घरी परतेपर्यंत पूर्ण सुरक्षा देण्याची हमी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. परंतु, आम्ही रात्री प्रवास न करण्यावर ठाम आहोत.'

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

सीबीआयकडून एफआयआर दाखल
काल रविवारी रात्री केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) यांनी उत्तर प्रदेश पोलिसांकडून प्रकरणाच्या तपासाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर सीबीआयने याप्रकरणात एफआयआर दाखल केली आहे. त्यात आरोपींच्या विरोधात सामूहिक बलात्कार, हत्येचा प्रयत्न, हत्या असे गुन्हे दाखल झाल आहेत. सीबीआयने याप्रकरणाच्या चौकशीची विशेष टीम नियुक्त केली आहे.