मुलीने मुलाला बाजरीच्या शेतात बोलावले असेल: भाजप नेता

वृत्तसंस्था
Wednesday, 7 October 2020

हाथरसमध्ये युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर देशात संतापाचे वातावरण असताना, भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्य केले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स त्यांच्यावर प्रतिक्रियांच्या माध्यमातून टीका करत आहेत.

लखनौ (उत्तर प्रदेश): हाथरसमध्ये युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर देशात संतापाचे वातावरण असताना, भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्य केले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स त्यांच्यावर प्रतिक्रियांच्या माध्यमातून टीका करत आहेत.

हाथरसमध्ये पुन्हा बलात्काराची घटना; चिमुरडीचा मृत्यू

बाराबंकी नगरपरिषद नवाबगंजचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते रणजीत श्रीवास्तव यांनी म्हटले आहे की, "प्रेमप्रकरणातून मुलीने मुलाला बाजरीच्या शेतात बोलावले असेल. तिला नातेवाईकांनी पकडले असणार, कारण शेतात हेच तर होते. ज्या मुलींचा अशाप्रकारे मृत्यू होतो त्या डाळीच्या, ऊसाच्या, मक्याच्या, बाजरीच्या किंवा नाल्यात अथवा जंगलात सापडतात. त्या धान किंवा गव्हाच्या शेतात मृतावस्थेत सापडत नाही आणि त्यांना कोणीही ओढत घेऊन जात नाही. अखेर अशा ठिकाणीच या घटना का होतात हा तपासाचा विषय आहे आणि मी चुकीचे बोललेलो नाही."

दरम्यान, आम आदमी पक्षाने या भाजप नेत्याचा व्हिडिओ शेअर करुन जोरदार टीका केली आहे. रणजीत श्रीवास्तव यांचा व्हिडिओ शेअर करताना आम आदमी पक्षाच्या ट्विटर हॅण्डलवर लिहिले आहे की, "या भाजप नेत्याचं वक्तव्य ऐकल्यास तुमचे रक्त खवळेल. अशा मुली ऊस, बाजरीच्या शेतातच सापडतात. जंगल आणि नाल्यात सापडतात. तो दिवस येऊच देऊ नका की जन्म होताच मुलीला मारुन टाकलं जाईल किंवा सती प्रथा सुरु केली जाईल. सीबीआयचा तपास झाला आहे, मुलं निर्दोष आहेत. त्या मुलांचं तारुण्य कोण परत करणार?'

हाथरसमध्ये 'आप'च्या खासदारांवर फेकली शाई

रणजीत श्रीवास्तव यांनी याआधीही मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना म्हणाले होते की, 'मुली ऊस, बाजरी आणि मक्याच्या शेतात गवत कापायला का जातात? या मुलींना एकांतात गवत कापायचं असतं त्यावेळी त्यांना ऊस, मका, बाजरीचचं शेत दिसतं का? दुसरीकडे त्यांना गवत मिळत नाही का?'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hathras case why is a girl found only in a sugarcane field says bjp leader