Manish Sisodia : मनीष शिसोदिया यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर

सलग चौथ्यांदा सुनावणी लांबणीवर पडल्यामुळे सिसोदिया यांच्या वकिलांनी नाराजी व्यक्त केली आहे
AAP  Manish Sisodia
AAP Manish Sisodia esakal

नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी येत्या शनिवारपर्यंत लांबणीवर पडली आहे. सलग चौथ्यांदा सुनावणी लांबणीवर पडल्यामुळे सिसोदिया यांच्या वकिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणी आरोप झालेल्या सिसोदिया यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचार करावयाचा असल्याचे सांगत जामीन मागितला आहे.

AAP  Manish Sisodia
Baramati News : बारामतीत इन्स्टाग्रामवरील स्टेटस पोलिसांनी तपासले अन पिस्तूलाची देवाणघेवाण करणारी साखळीच समोर आली

सिसोदिया यांना मागील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली होती. त्यानंतर सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) त्यांना अटक करण्यात आली. सिसोदिया यांनी जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र दोन्ही ठिकाणी त्यांच्या पदरी निराशा आली होती. सर्वोच्च न्यायालयाने ३० ऑक्टोबर २०२३ रोजी त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. दरम्यान, सिसोदिया यांना त्यांच्या आजारी असलेल्या पत्नीला भेटण्याची परवानगी विशेष न्यायालयाने दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com