हॉकीपटू बलबीर सिंग यांचे निधन; क्रीडाजगतात हळहळ

वृत्तसंस्था
सोमवार, 25 मे 2020

भारतीय हॉकी विश्वातील दिग्गज खेळाडू बलबीर सिंग यांचे आज (ता.२५) सोमवारी निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते.

नवी दिल्ली : भारतीय हॉकी विश्वातील दिग्गज खेळाडू बलबीर सिंग यांचे आज (ता.२५) सोमवारी निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटका आल्यानं त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. मागील काही दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्ये भरती होते. स्वातंत्र्यानंतर तीन ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या चार खेळाडूंपैकी बलबीर हे एक होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

ऑलिम्पिक स्पर्धेत १९४८, १९५२ आणि १९५६ मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. भारताच्या सुवर्णयुगाचे ते साक्षीदार होते.१९५२च्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी अंतिम सामन्यात नेदरलँडविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी केली होती. भारतानं तो सामना ६-१ अशा मोठ्या फरकानं जिंकला होता. या सामन्यात बलबीर सिंग यांनी पाच गोल केले होते. भारतीय संघात सेंटर-फॉरवर्ड म्हणून बलबीर यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक गोल करण्याचा हा विक्रम आजही अबाधित आहे. १९५७मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केले गेले आणि हा पुरस्कार पटकावणारे ते पहिले खेळाडू होते. दरम्यान, त्यांच्या जाण्याने क्रीडाजगतात हळहळ व्यक्त करण्यात येत असून अनेक दिग्गजांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या वाचा :-
--------
वडिलांना सायकलवरून घेऊन जाणाऱ्या ज्योतीने फेटाळला क्रीडामंत्र्यांचा प्रस्ताव
--------
भारतीय शास्त्रज्ञांची कमाल; तयार केला विषाणू नष्ट करणार मास्क; एवढी आहे किंमत
--------
कोरोनाची जगातली परिस्थिती : जाणून घ्या एका क्लिकवर
--------
पुण्यावरून 'या' आठ शहरांसाठी सुरु झाली विमानसेवा; लोहगाववरून टेक ऑफ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hockey legend Balbir Singh Sr dies at the age of 96

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: