
Horror Railway Station : लहानांपासून मोठ्यांपर्यंत एखाद्याने हॉरर मूव्ही जरी बघितला तरी रात्री झोपताना मुलांची आणि मोठ्यांचीसुद्धा घाबरगुंडी उडते. भारतातसुद्धा अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे सायंकाळ होतास तिथे जाण्यास बंदी घातली जाते. या ठिकाणी भूतांचा वास आहे असा समज आहे. त्यामुळे लोकही अशा ठिकाणी रात्री जाण्याची हिंमत करत नाही. भानगड किल्ला हे याचे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.
मात्र आज आम्ही तुम्हाला ज्या ठिकाणाबाबत सांगणार आहोत किल्ला नसून एक रेल्वे स्टेशन आहे. जे भुतांच्या भीतीमुळे 42 वर्षांपासून बंद ठेवण्यात होते. या रेल्वे स्टेशनवर नेमकी काय भानगड होती ते आज आपण जाणून घेऊया.
पांढऱ्या साडीत एक महिला रात्रीच्या अंधारात रुळावरून चालताना दिसली होती
हे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात आहे, ज्याचे नाव बेगुनकोडोर रेल्वे स्टेशन आहे. 1960 मध्ये हे रेल्वे स्टेशन सुरू झाल्यानंतर ते काही काळ सुरळीत चालले, परंतु सहा वर्षांनी म्हणजे 1967 मध्ये हे स्टेशन बंद झाले. कारण, काही रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्टेशनवर एका महिलेचे भूत पाहिल्याचा दावा केला होता.
न्यूज नेशनने दिलेल्या माहितीनुसार उरी येथील महिलेचा या रेल्वे स्थानकावर रेल्वेरूळाखाली मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. सुरुवातीला लोकांनी या अफवेवर विश्वास ठेवला नाही, पण नंतर स्टेशन मास्टरने पांढऱ्या साडीत एक महिला रात्रीच्या अंधारात रुळावरून चालताना पाहिली. धक्कादायक बाब म्हणजे काही दिवसांनीच स्टेशन मास्टर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा मृतदेह रेल्वे स्थानकावरच आढळून आला.
स्टेशन मास्टर आणि त्यांच्या कुटुंबाच्या मृत्यूने उडाली खळबळ
स्टेशन मास्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मृत्यूमागे भूताचा हात असल्याचा दावा रेल्वे कॉलनीत राहणाऱ्या लोकांनी केला. या घटनेनंतर लोकांनी सूर्यास्त होताच स्टेशनवर थांबणे बंद केले आणि हे स्थानक भूतिया स्टेशन म्हणून ओळखले जाऊ लागले. (Railway Station)
या चर्चा एवढ्या टोकाला गेल्या की, संध्याकाळनंतर स्टेशनवरून कोणतीही ट्रेन गेली की त्या ट्रेनसोबत महिलेचे भूतही धावू लागते अशा अफवा परसल्या.
याशिवाय अनेकांनी भूतांना ट्रॅकवर नाचताना पाहिल्याचा दावाही केला आहे. या घटनांनंतर हे स्थानक ४२ वर्षे बंद होते. यादरम्यान एकही गाडी येथे थांबली नाही. यानंतर, तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांच्या आदेशानुसार 2009 मध्ये हे स्थानक पुन्हा सुरू करण्यात आले.
डिस्क्लेमर - सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.