धक्कादायक! तब्बल एवढे भारतीय लग्नापूर्वी करतात सेक्स; सरकारी सर्वेक्षणात माहिती समोर

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात (National Family Health Report) भारतीयांना विवाह, लैंगिक संबंध आणि जोडीदाराशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले.
National Family Health Report on sex life of indians
National Family Health Report on sex life of indiansSakal

National Family Health Report: राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा ताजा अहवाल सध्या चर्चेत आहे. या सर्वेक्षणात भारतीयांना विवाह, लैंगिक संबंध आणि जोडीदाराशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले. अहवालात लग्नाचे वय आणि पहिल्यांदा लैंगिक संबंध ठेवण्याचे वय पूर्णपणे भिन्न असल्याचे आढळून आले. या सर्वेक्षणात हे जाणून घेण्याचाही प्रयत्न केला की भारतीय लोक लग्नापूर्वी सेक्स करतात की नाही? आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, लग्नापूर्वी त्यांचे शारीरिक संबंध होते परंतु विविध समुदायांमध्ये एक वेगळी पद्धत आहे.

National Family Health Report on sex life of indians
सेक्स लाईफमध्ये आलेला ब्रेक तुमच्या शरीरावर परिणाम करू शकतो, जाणून घ्या ७ धोके

किती भारतीय लग्नाआधी सेक्स करतात?-

लग्नाआधी पुरुषांचे सेक्सचे प्रमाण स्त्रियांपेक्षा अधिक आहे. सर्वेक्षणात सरासरी 7.4 टक्के पुरुष आणि 1.5 टक्के महिलांनी लग्नाआधी सेक्स केल्याचे मान्य केले. सर्वेक्षणात सुमारे 12% शीख पुरुषांनी लग्नापूर्वी सेक्स केल्याचे सांगितले. हा आकडा सर्व धार्मिक समुदायांमध्ये सर्वाधिक आहे. त्याच वेळी, शीख महिलांमध्ये हा आकडा केवळ 0.5% होता, जो सर्वात कमी होता. हिंदू पुरुषांमध्ये ही संख्या 7.9 टक्के, मुस्लिम पुरुषांमध्ये 5.4 टक्के, ख्रिश्चन पुरुषांमध्ये 5.9 टक्के आहे. महिलांमध्ये 1.5 टक्के हिंदू, 1.4 टक्के मुस्लिम आणि 1.5 टक्के ख्रिश्चनांनी लग्नापूर्वी सेक्स केल्याचे मान्य केले.आर्थिक परिस्थितीचाही या गोष्टीशी संबंध होता. उदाहरणार्थ, श्रीमंत पुरुष आणि गरीब स्त्रिया विवाहापूर्वी लैंगिक संबंध ठेवतात.

विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवण्याबाबत स्त्री-पुरुष दोघांचाही दृष्टिकोन सारखाच असल्याचे आढळून आले. तथापि, स्त्रिया क्वचितच उघडपणे कबूल करतात. सध्या महिलांचे सरासरी लैंगिक साथीदार 1.7 टक्के आहेत तर पुरुषांचे प्रमाण 2.1 टक्के आहे. 2006 मध्ये झालेल्या NFHS च्या तिसऱ्या सर्वेक्षणाबाबत बोलायचे तर, हे प्रमाण महिलांमध्ये 1.02 आणि पुरुषांमध्ये 1.49 होते.

National Family Health Report on sex life of indians
लग्नानंतरच सेक्स लाईफ उद्ध्वस्त होऊ द्यायचं नसेल तर या ८ चुका टाळा!

बायकोला शारीरिक संबंधास नकार द्यायचा अधिकार आहे की नाही -

वैवाहिक जीवनातील लैंगिक संबंध हा पूर्णपणे पुरुषप्रधान समाजाशी संबंधित आहे. सर्वेक्षणात 87 टक्के महिला आणि 83 टक्के पुरुषांनी पत्नींनी सेक्सला नकार देणे योग्य असल्याचे सांगितले. तथापि, ही टक्केवारी राज्यानुसार बदलते. मेघालय आपल्या मातृसत्ताक समाजासाठी प्रसिद्ध आहे, तरीही येथील केवळ 50% पुरुषांनी सांगितले की पत्नी लैंगिक संबंधांना नकार देऊ शकतात. अनेक राज्यांतील महिलांचेही हेच मत आहे. उदाहरणार्थ, अरुणाचल प्रदेशातील सुमारे 30% महिलांनी सांगितले की जेव्हा एखाद्या महिलेचा पती लैंगिक संबंध ठेवू इच्छितो तेव्हा तिला नकार देणे योग्य नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com