सेक्स लाईफमध्ये आलेला ब्रेक तुमच्या शरीरावर परिणाम करू शकतो, जाणून घ्या ७ धोके | Healthy Lifestyle | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sex Life

सेक्स लाईफमध्ये आलेला ब्रेक तुमच्या शरीरावर परिणाम करू शकतो, जाणून घ्या ७ धोके

उत्तम सेक्स लाईफ माणसाच्या वैवाहीक आयुष्यात गोडवा आणते पण सेक्स लाईफ व्यवस्थीतपणे जपणे, मोठ्या जोखमीचं काम आहे. कधी ब्रेकअप तर कधी व्यस्त वेळापत्रक तर कधी घटस्फोट घेण्याचा निर्णय यामुळे नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो आणि पार्टनरपासून दुरावा निर्माण होतो त्यामुळे सेक्स लाईफ मध्ये खंड पडतो पण तुम्हाला माहिती आहे का की सेक्स लाईफमध्ये खंड पडणे तुमच्या शरीरावर परिणाम करू शकते.

सेक्स लाईफ मध्ये खंड पडल्यास तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम पडू शकतात. जाणून घ्या त्यातील सात महत्त्वाचे परिणाम. (break from sex can have an impact on body check here)

हेही वाचा: Break-up करण्यापूर्वी स्वत:ला विचारा हे पाच प्रश्न

१. हृदयावर परिणाम होतो

जास्त वेळ सेक्सपासून दुर राहणे तुमच्या हृदयासाठी चांगले नाही, सेक्स लाईफमध्ये ब्रेक तुमच्या ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम करते. त्यामुळे सेक्स करणे हे अतिरिक्त कॅलरीज जाळण्याचा एक उत्तम मार्ग असून, यामुळे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या पातळीमध्येसुद्धा संतुलन राखण्यास मदत होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

२. तणाव वाढवते

लैंगिक संभोगादरम्यान एंडॉर्फिन आणि ऑक्सिटोसिन सारखे आनंदी हार्मोन्स शरीरात सोडले जातात पण जेव्हा तुम्ही सेक्समध्ये खंड पाडता तेव्हा तुमचे शरीर यापैकी कमी हार्मोन्स सोडते, ज्यामुळे तुम्हाला तणावाचा सामना करावा लागतो.

हेही वाचा: Weight Loss Tips: लग्नाआधी वजन कमी करायचंय? फॉलो करा खास टिप्स

३. स्मरणशक्ती कमकूवत होते

सेक्सचा अभाव तुमची स्मरणशक्ती कमकूवत करु शकतो. अनेक अभ्यासातून असे समोर आले आहे की जेव्हा सेक्स लाईफमध्ये खंड पडतो तेव्हा स्मरणशक्तीच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. स्मरणशक्ती सुधारण्यासाठी विशेषत: 50 ते 89 वयोगटातील लोकांनी नियमित लैंगिक संबंध ठेवणे गरजेचे आहे

४. कामवासना कमी होते

सेक्स लाईफमध्ये पडलेला खंड नात्यातला पुर्णपणे रस गमावण्यास कारणीभूत ठरू शकतो. नियमित सेक्स करणे तुमची कामवासना किंवा तुमची लैंगिक इच्छा वाढवू शकते. त्यामुळे तुमची सेक्स लाईफ सुरळीत आणि चांगली असेल तर याचा सकारात्मक परिणाम तुमच्या नात्यावर होईल.

५. कमकूवत रोगप्रतिकारशक्ती

सेक्स लाईफमध्ये पडलेला ब्रेक तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी करू शकते. यामुळे तुम्ही सर्दी किंवा व्हायरल फ्लूला बळी पडू शकता. नियमित सेक्स केल्याने तुमचे शरीर आजाराशी लढण्यास तयार होते.

हेही वाचा: पती-पत्नीच्या या चार सवयी वाढवतात भांडण... सुधारल्यास होईल वैवाहिक जीवन सुखी

६. योनीचे आरोग्य खालावते

जास्त काळ सेक्सलाईफमध्ये ब्रेक घेतल्याने योनीचे आरोग्य अस्वस्थ होऊ शकते. सहज संभोग करण्यासाठी स्त्री शरीर स्व-उत्तेजीत होण्यास जास्त वेळ घेतो. याशिवाय नियमित हस्तमैथुन करणे योनीला निरोगी ठेवण्यास मदत करते आणि त्यामुळे रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होते.

७. शरीर दुखणे वाढते

शरीर दुखण्यापासून मुक्त होण्याचा लैंगिक संभोग हा एक चांगला मार्ग आहे. लैंगिक संभोग दरम्यान एंडॉर्फिन आणि इतर हार्मोन्सचा उच्च प्रवाह डोके, पाठ आणि पाय दुखणे कमी करण्यास मदत करू शकतो तसेच मासिक पाळीत होणारा त्रास देखील कमी करतो.

Web Title: Break From Sex Can Have An Impact On Body Check Here

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top