'लॉकडाउनमध्ये किती प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला?'

वृत्तसंस्था
Monday, 14 September 2020

देशात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनदरम्यान अनेक प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला. पण, याबाबतची आकडेवारी सरकारकडे उपलब्ध नाही.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनदरम्यान अनेक प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला. पण, याबाबतची आकडेवारी सरकारकडे उपलब्ध नाही. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून, लॉकडाउनमध्ये किती प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला असा प्रश्न विरोधकांनी उपस्थितीत केला होता. यावर मोदी सरकारने आपल्याकडे कोणतीही माहिती आणि संख्या नाही, असे स्पष्ट केले.

सैराट: 'मला माफ करा, मी माझ्या पतीकडे जातेय'

लॉकडाऊन लागू झाल्यानंतर अनेक मजूरांनी आपल्या गावची वाट धरली होती. हजारो किलोमीटर पायपीट करून मजूर आपल्या गावी पोहोचले होते. प्रवासादरम्यान अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. संबंधित छायाचित्रे, बातम्या व्हायरल झाल्या होत्या. याच मुद्दावरून विरोधकांनी प्रवासी मजुरांबद्दल प्रश्न उपस्थितीत केले. सरकारकडे प्रवासी मजुरांची संख्या किती आहे. त्या मजुरांची ओळख पटवता आली आहे का? सरकारने प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला तर त्यांची नोंद ठेवली गेली का? लॉकडाउनच्या काळात रेशन कार्डधारक लोकांना मोफत धान्य वाटप करण्यात आले आहे का? जर केले असेल तर किती प्रमाणात वाटप करण्यात आले आहे? असे प्रश्न संसदेत उपस्थितीत करण्यात आले होते. लोकसभेत विरोधकांनी प्रश्नांची सरबती केल्यानंतर मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी लिखित उत्तर दिले आहे.

लाखो रुपयांचे बक्षीस असलेला 'लव्हगुरू' अटकेत

लॉकडाउनच्या काळात किती रेशन कार्डधारकांना अन्न धान्य वाटप करण्यात आले याबद्दल मंत्रालयाने सांगितले की, प्रत्येक राज्यानुसार आकडेवारी उपलब्ध नाही. परंतु, संपूर्ण देशात 80 कोटी लोकांना पाच किलो अतिरिक्त तांदूळ किंवा गहू, एक किलो दाळ नोव्हेंबर 2020 पर्यंत देण्यात आली आहे. या शिवाय सरकारकडून लॉकडाउनच्या काळात गरीब कल्याण योजना, आत्मनिर्भर भारत पॅकेज, ईपीएफ योजने सारखे मोठे निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how many migrant workers died in the lockdown modi government says no record