पांढऱ्या केसांनी केला रवी पुजारीचा घात; अलगद अडकला जाळ्यात 

टीम ई-सकाळ
Tuesday, 25 February 2020

सेनेगल पोलिसांनी 19 जानेवारी 2019 रोजी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला अटक केली. त्यावेळी तो सलूनमध्ये केस काळे करण्यासाठी जात होता.

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला बेड्या ठोकून भारतात आणण्यात भारत सरकारला अखेर यश आले आहे. गत 26 वर्षांपासून सुरू असलेला लपंडाव अखेर संपुष्टात आला आहे. सध्या कर्नाटक पोलिस त्याची कस्सून चौकशी करत असून त्याच्याकडून अनेक गोष्टी पुढे येत आहेत. भारतात रवी पुजारीविरोधात अनेक गंभीर प्रकरण दाखल झाले होते. असे असले तरी भारत सोडल्यानंतरही त्याची हत्या आणि वसुलीची कामे सुरूच होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलो करा ई-सकाळचे ऍप 

सेनेगल पोलिसांनी 19 जानेवारी 2019 रोजी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला अटक केली. त्यावेळी तो सलूनमध्ये केस काळे करण्यासाठी जात होता, असे सेनेगल पोलिसांचे म्हणने आहे. अटक केल्याच्या 1 वर्षांनंतर सेनेगल सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्याला भारताकडे सुपूर्द करण्यात आले. विशेष म्हणजे, तो 1994 मध्ये भारतातून पळाल्यानंतर पाच देशांमध्ये चार वेगवेगळ्या नावांनी राहत होता. रवी पुजारी छोटा राजनच्या खूप जवळचा होता. जेव्हा पुजारीवर दबाव वाढला तेव्हा तो 1994 मध्ये आधी नेपाळला पळाला आणि त्यानंतर बॅंकॉकला फरार झाला. तो 1994 पासून पुढची चार वर्षे धंदा करत होता. पुजारी मुंबईमध्ये अनेक गंभीर प्रकरणांमध्ये अडकलेला होता. तर 1994 ते 1998 दरम्यान पुजारी नेपाळहून आपले बेकायदेशीर धंदे चालवत होता. मात्र पोलिसांच्या दबावानंतर त्याने नेपाळहून सुद्धा पळाला होता. यानंतर 2003 पर्यंत तो बॅंकॉकमध्ये वास्तव्यास होता, असा दावा पोलिसांनी केला आहे.

आणखी वाचा - हिंदू टेररिस्ट ट्विटमुळं उफाळला नवा वाद!

आणखी वाचा - दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी ओवैसींनी सुचवला पर्याय

पुजारीने कसिनो आणि डान्स बारमध्ये खूप पैसा लावला होता. मात्र बॅंकॉकच्या स्थानिक माफियासोबत वाद झाल्यामुळे बॅंकॉक सुरक्षित नसल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे तो बॅंकॉकहून सुदानला पळाला. तिथे त्याने कपड्याचा व्यवसाय सुरू केला. मात्र त्यात नुकसान झाल्यामुळे तोही व्यवसाय त्याला बंद करावा लागला. त्यानंत पुजारी बुर्किना फासो येथे शिफ्ट झाला. बुर्किना फासोमध्ये जेव्हा त्याला यश मिळाले नाही तेव्हा 2015 मध्ये रवी पुजारी सेनेगलला पळून गेला. तिथे त्याने महाराजा इंडियन रेस्टॉरंट सुरू केले. सेनेगलमध्ये त्याचा व्यवसाय चांगला चालला. अंडरवर्ल्ड गुरू छोटा राजन त्याला अँटनी फर्नांडिस बोलवत होता. काही काळानंतर रवी पुजारीने आपले नाव बदलले आणि टोनी फर्नांडिस ठेवले. टोनी फर्नांडिस या नावाने तो नेपाळ, बॅंकॉक आणि सुदानमध्ये राहिला. बुर्किना फासोमध्ये आल्यानंतर त्याने आपले नाव रॉकी फर्नांडिस सांगितले आणि याच नावाने त्याने पासपोर्ट सुद्धा तयार केले होते, अशी माहिती पुढे आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how underworld don ravi pujari got arrested information marathi