चित्रपटगृहात पती-पत्नी अन् गर्लफ्रेण्डची फ्री स्टाईल...

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

पती त्याच्या मैत्रीणीसोबत चित्रपट पाहायला गेल्याची माहिती त्याच्या पत्नीला समजली. पत्नीने थेट चित्रपटगृहात प्रवेश केला आणि फ्री स्टाईल हाणामारी झाली. पोलिसांपर्यत प्रकरण गेल्यानंतर पोलिसांनी तिघांना चौकीत नेल्याची घटना येथे घडली.

अहमदाबाद (गुजरात) : पती त्याच्या मैत्रीणीसोबत चित्रपट पाहायला गेल्याची माहिती त्याच्या पत्नीला समजली. पत्नीने थेट चित्रपटगृहात प्रवेश केला आणि फ्री स्टाईल हाणामारी झाली. पोलिसांपर्यत प्रकरण गेल्यानंतर पोलिसांनी तिघांना चौकीत नेल्याची घटना येथे घडली.

युवती म्हणते, माझ्या होणाऱया बाळाचे चार बाबा...

अहमदाबाद शहरामधील एका चित्रपटगृहामध्ये अभिनेत्री राणी मुखर्जीचा मर्दानी 2 हा चित्रपट सुरू आहे. एकजण मैत्रीणीला सोबत घेऊन चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. चित्रपटगृहात दोघे चित्रपट पाहात होते. यावेळी पती मैत्रिणीसोबत चित्रपट पाहायला गेल्याची माहिती पत्नीला मिळाली. पत्नीने थेट चित्रपटगृह गाठले. चित्रपटगृहात प्रवेश केल्यानंतर दोघांना एकमेकांच्या मिठीत पकडले. पत्नीने प्रथम नवऱयाची धुलाई केली. मित्राला मारहाण होत असल्याचे पाहून मैत्रिण मध्ये आल्यानंतर दोघींची फ्री स्टाईल हाणामारी चित्रपटगृहात झाली. चित्रपट सुरू असतानाच एकच गोंधळ उडाला. कोण-कोणाला मारतेय हेच समजत नव्हते. अखेर नवरंगपुरा पोलिसांपर्यंत प्रकरण गेले. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर तिघांना घेऊन चौकीत गेले.

दोन मित्र अऩ् एक मैत्रिण; तर मैत्रिण कोणाची?

पोलिसांनी सांगितले की, मैत्रिणीसोबत चित्रपट पाहण्यासाठी दबंग 3 चे तिकिट काढले होते. अचानक दोघांनी मर्दानी 2 हा चित्रपट पाहण्याचे ठरवले. याबद्दलची माहिती पत्नीला समजली आणि तिने दोघांना पकडले. याप्रकरणात तक्रार दाखल झालेली नाही. तिघांना समजावून सोडून देण्यात आले आहे.

Video: नवऱ्याला प्रेयसीसोबत रंगेहात पकडलं अन्...

दरम्यान, पती-पत्नी अन् त्याची गर्लफ्रेण्ड बरोबरच मर्दानी 2 चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

पती आणि प्रेयसीला पकडले रंगेहात; काढला व्हिडिओ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband watching movie with girlfriend and wife catch him